या चक्रीवादळाचा राज्याला धोका नसला तरी समुद्रातील वातावरण खडबडीत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
वैभववाडी : अरबी समुद्रात (Arabian Sea) असनी चक्रीवादळाची (Cyclone Asani) निर्मिती झाली असून या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नसला तरी कोकण किनारपट्टीला ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.