अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सावंतवाडी : गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पाऊस (Weather Update) लवकर थांबला असल्यामुळे त्याचे आगमनही लवकर होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र मिरगाचा मुहूर्तही टळला असून पाऊस आता आणखी एक आठवडा लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून लांबलेला उन्हाळा व पाणीटंचाई यामुळे नागरिकही हवालदिल झाले आहेत. या वर्षी केरळमध्ये उशिराने मॉन्सून (Monsoon) दाखल होणार असल्याने कोकणात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात त्याच्या आगमनाची शक्यता वर्तविण्यात आली होती; मात्र पाऊस आता लांबणार असल्याची माहिती मिळत आहे.
पावसाचे (Rain) उशिरा आगमन होणार असल्याने आता शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी थांबावे लागणार आहे. काही ठिकाणी विहीर व नद्यांमधील पाण्याचा वापर करून भिजणीचे तरवे घालण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. दरवर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर येणाऱ्या पावसाचा अद्यापही पत्ता नाही. मॉन्सून १५ जूननंतर येण्याची शक्यता आता वर्तविली आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणातील शेतकरी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच शेतीसाठी उपयुक्त असलेल्या साधन सामग्रीची साफसफाई आणि दुरुस्ती करून तयार असतो.
तुळस येथील जैतिरोत्सवाच्या बाजारात तसेच तालुक्याच्या आठवडा बाजारात शेतीला लागणारी फावडी, कुदळ, नांगर, जगली त्यांची खरेदी शेतकरी करतात. कांबळीला (फटकूर) पर्याय म्हणून आता प्लास्टिक कापड आणि रेनकोटही शेतकरी वापरताना दिसतात; मात्र पाऊसच लांबल्यामुळे याची खरेदीही होताना दिसत नाही. त्यामुळे व्यापारी वर्गातही चिंतेचे वातावरण दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.