लोहा (रायगड) : इयत्ता आठवी आणि दहावी वर्गाची नवी पाठ्यपुस्तक बांधणी अत्यंत तकलादू आहे. आठवडाभराच्या हाताळणीत पुस्तकाच्या पानांची गळती होत असल्याने विद्यार्थ्यांना सुई-दोऱ्याने शिवुन घेण्याचे अगाऊ काम लागले आहे.
पुण्याच्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यायक्रम संशोधन मंडळाने सन 2018 प्रथम आवृत्ती काढली आहे. इयत्ता आठवीच्या भाषा (बालभारती) 104 पृष्ठसंख्या आहे. इयत्ता दहावी भाषा (कुमारभारती ) 120 यवढी पृष्ठसंख्या आहे. भाषाविभागाची अक्षरजुळवणी बऱ्यापैकी असली तरी प्रत्येक पाने खिळखिळी झाल्याने क्रम लागत नाही.
आठवडाभरात पुस्तकाची अक्षरश: चाळणी होत असल्याने विद्यार्थ्यांची डोकेदुखी बनली आहे. पाठ्यघटकांशी संबंधित क्यू.आर. कोड मराठी भाषाअधिक समजावी .विद्यार्थ्यांची आकलनक्षमता समृद्ध व्हावी या दृष्टीने उपयोजित लेखन सराव उपयुक्त ठरतो आहे. पाठाच्या शेवटी अॅपच्या माध्यमातून संकेतस्थाळावरून माहिती देण्यात आली आहे. त्याचा उपयोग होईल असे मत मुख्याध्यापक बी.बी. खांडेकर यांनी व्यक्त केले.
शिक्षण विस्तार अधिकारी फातेमा पठाण म्हणाल्या, “यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला प्रत्येक शाळेतील विद्यार्थांला मोफत पुस्तकसंच पुरविण्यात आला आहे. पुस्तक बांधणी व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कार्यानुभव तासिकेतुन गळती असलेल्या पानांची सुईदोऱ्याने बांधणी करून एक वेगळा आनंदानुभूती विद्यार्थांला देता येईल. शिक्षकांनी हा उपक्रम घ्यावा.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.