आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडोंना मिळणारी 'व्हेल' ची उलटी सापडली

उलटीला अंबरग्रीस म्हटले जाते.
Sperm whale vomiting
Sperm whale vomitingSakal
Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) : देवबाग (Devbagh Beach) येथील समुद्रकिनाऱ्यावर काल सकाळी स्थानिक मच्छीमार फ्रान्सिस फर्नांडिस आणि किस्तु लुद्रीक (Fishermen Francis Fernandes, Kistu Ludrick) यांना सुमारे साडेदहा किलोची स्पर्म व्हेलची उलटी (Sperm whale vomiting) (अंबरग्रीस) सापडली. उलटीला अंबरग्रीस म्हटले जाते.

Summary

स्पर्म व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याची किंमत करोडोंमध्ये असते.

याबाबतची माहिती तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्‍यांना देण्यात आली. अधिकाऱ्‍यांनी देवबाग येथे जात अंबरग्रीस ताब्यात घेतले. ते, पुढील तपासणीसाठी कोलकाता येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनपाल अमृत शिंदे यांनी दिली.

स्पर्म व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याची किंमत करोडोंमध्ये असते. यामुळे याच्या तस्करीचे प्रकार घडतात. नुकताच असा एक प्रकार उघड झाल्यानंतर ही उलटी चर्चेत आली होती. या पार्श्वभूमीवर देवबागमध्ये उलटी सापडण्याची घटना महत्त्‍वाची मानली जात आहे.बोम्मईंच्या मंत्रिमंडळात जोल्ले, कत्तींचा वरचष्मा; मिळाली 'ही' खाती

Sperm whale vomiting
बोम्मईंच्या मंत्रिमंडळात जोल्ले, कत्तींचा वरचष्मा; मिळाली 'ही' खाती

देवबाग मधलीवाडी येथील मच्छीमार फर्नांडिस आणि त्यांचे सहकारी लुद्रीक सकाळी साडेसहाच्या दरम्यान समुद्रकिनारी गेले असता त्यांना स्पर्म व्हेलची उलटी सापडून आली. त्यांनी तत्काळ याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांना दिली. यावर खोबरेकर यांनी या उलटीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची फर्नांडिस यांना सूचना केली. याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर कुडाळचे वनपाल अमृत शिंदे आणि वनपरिमंडळ अधिकारी श्रीकृष्ण परीट घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून सुवासिक अंबरग्रीस ताब्यात घेतले. त्यावेळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. अधिकाऱ्‍यांनी मच्छीमारांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. ग्रामस्थांनी या मच्छीमारांना इनाम देण्याची मागणी केली.

शिंदे म्हणाले, ‘‘व्हेल माशाची उलटी दुर्मिळ आहे. वन्यजीव कायदा १९७२ नुसार त्याला संरक्षण देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही व्हेल माशाला दुर्मिळ म्हणून संरक्षण दिले आहे. वन्यजीव कोणताही असेल तरी त्याचे अवयव आपल्याला विकता येत नाहीत. व्हेल माशाच्या उलटीचा उच्चप्रतीच्या अत्तरासाठी वापर केला जातो, हे आपण सर्वजण ऐकून आहोत. वनविभागास सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य खोबरेकर यांच्यासह स्थानिक मच्छीमारांचे कौतुक आहे. सुमारे आठ ते दहा किलो वजनाची उलटी आहे. शासनाकडून या उलटीची किंमत निश्‍चिती होईल, त्यावेळी मच्छीमारांना शासनाकडून इनाम किंवा प्रोत्साहनपर मदत मिळवून देण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.