National Doctor Day: तिसऱ्या लाटेत मुलांवरील धोका टाळणे शक्य

National Doctor Day: तिसऱ्या लाटेत मुलांवरील धोका टाळणे शक्य
Updated on

रत्नागिरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हा लहान मुलांवर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र थोडी काळजी, मुलांचे लसीकरण, उत्तम खाणे, नियमित व्यायाम याकडे पालकांनी लक्ष दिल्यास मुलांवरचा धोका टाळणे शक्य होईल, असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यांनी केले. (world-doctor-day-expert-advice-possibility-fight-in-covid-third-wave-children-kokan-update-marathi-news)

डॉक्टर्स डे निमित्त त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा डॉ. शिंदे म्हणाले, मुले लढाऊ वृत्तीची असतात. त्यांच्यातील ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती ही मोठ्यांपेक्षा अधिक प्रभावी असते. त्यामुळे कोरोनाची गंभीर लागण होण्याचा धोका मुलांना कमी आहे. तरीही या रोगाचा सामना करण्यासाठी मुलांना तयार करायचे असेल तर त्यांच्या खाण्यापासूनच सुरवात केली पाहिजे. मुलांनी हाय प्रोटीन डाएट केले पाहिजे. मांसाहारासाठी मासे, मटण व अंडी तर शाकाहारींसाठी पनीर, सोयाबीन, डाळी, सुका मेवा असे खायला हवे. बाहेरचे खाणे, जंकफूड टाळा. चांगली झोप आणि भरपूर पाणी पिणेही आवश्यक आहे.

कोरोनामध्ये ताप आणि फुफ्फुसांना होणारी लागण हे प्रमुख लक्षणे आहेत. त्यामुळे फ्लू आणि फुफ्फुसाशी निगडित न्यूमोनियाचे लसीकरण मुलांना करावे. फ्लू आणि कोविडची लक्षणे समान आहेत. वयानुसारचे लसीकरणही अत्यावश्यक आहे. सर्वांप्रमाणेच मुलांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणेही आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुलांना कोरोनाची लागण झाल्यास अशा मुलाचे शरीराचे तापमान सतत पाहणे आवश्यक असते. श्वासाचा त्रास, मूल मलूल झाले, धाप लागणे, अंगावर पुरळ उठणे ही सुद्धा कोविडची लक्षणे असून असे काहीही जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे. पोटात दुखणे, जुलाब, उलटी, ताप येणे ही लक्षणे कोरोनामध्ये दिसून आली आहेत. खेळणारे मूल अचानक मलूल होते, त्याला अचानक थकवा, चक्कर, चालता येत नसेल तर ही कोविडची लक्षणे असू शकतात, हे पालकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.

लागण झाल्यास ही काळजी घ्या

कोरोनाची लागण झाल्यास काळजी घेताना घरातील सहव्याधी असलेल्या नातेवाइकांना, ज्येष्ठांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी या लोकांनीच 'रिव्हर्स क्वारंटाईन' आवश्यक आहे. मुले मास्क बांधून बराच वेळ राहू शकत नाहीत, विलगीकरणात राहू शकत नाहीत. त्यामुळे अशा आजारी किंवा ज्येष्ठ नातेवाइकांनीच स्वतःला मुलांपासून वेगळे करणे आवश्यक आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. गरोदर व स्तनपान करणाऱ्या मातांनी लसीकरण करवून घ्यावे.

कोरोनाशी लढा

बालरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ पत्नी डॉ. तोरल शिंदे दांपत्य गेल्या महिन्यात कोरोनाबाधित होते. या आजाराचा सामना करताना त्याच्याशी लढणे आवश्यक आहे, असा संदेश देत हे दांपत्य पुन्हा रुग्णसेवेसाठी कार्यरत झाले आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्यावर एक नजर..

जंकफूड टाळा. चांगली झोप, भरपूर पाणी प्यावे

फ्लू, फुफ्फुसाशी निगडित न्यूमोनियाचे लसीकरण करा

लागण झाल्यास अशा मुलाचे शरीराचे तापमान सतत पाहा

श्वासाचा त्रास, धाप लागणे, अंगावर पुरळ आदी लक्षणे

कोरोनात दिसली पोटात दुखणे, जुलाब, उलटी, ताप ही लक्षणे

लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक

आजारी वा ज्येष्ठ नातेवाइकांनीच मुलांपासून वेगळे रहावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()