World Environment Day - सड्यांची परिसंस्था म्हणजे कोकणची श्रीमंती

शेती, बागांसाठीही उपयोग; वनस्पती वैविध्यही
World Environment Day - सड्यांची परिसंस्था म्हणजे कोकणची श्रीमंती
Updated on

एक नजर

  • दक्षिण कोकणची खास ओळख

  • सच्छिद्रता, कठीणपणा कमी-अधिक

  • चुंबकीय विस्थापन असलेला भाग

  • लाजुळ परचुरीतील स्पंजसारखा जांभा

  • देवगड परिसरातील मऊ जांभा

रत्नागिरी : जिकडे नजर टाकावी तिकडे लाल, निळ्या, पिवळ्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगाची उधळण करणारी रंगीबेरंगी इवलीशी रानफुले म्हणजे धरतीने नेसलेल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा लाभलेल्या शालूवरील जणू काही नाजूक वेलबुट्टी. या रंगीबेरंगी फुलांच्या संमेलनात सामील होणारी पाण्याने गच्च भरलेली लहान-मोठी तळी. हे वर्णन आहे जिल्ह्यातील सड्यांचे. येथील परिसंस्था म्हणजे कोकणची श्रीमंती आहे.

हे सडे टिकवण्याची गरज पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला सुधीर रिसबुड यांनी अधोरेखित केली. पिण्याच्या पाण्यापासून ते पिकांच्या उत्पादनापर्यंत हे सडे मुख्य आधार आहेत. विहिरी, तलाव, नैसर्गिक झरे ही या सड्याची मोठी देणगी आहे. या सड्यांवर वाढणारे गवत, झाडोरा गुरा-ढोरांना चारा म्हणून उपयोगी येतो. सड्यांवरील वनस्पती वैविध्यामुळे निर्माण झालेली सूक्ष्मद्रव्य पाण्याबरोबर वाहत जाऊन आजूबाजूच्या शेतातील, बागेतील माती पोषक बनवतात व खतांवरील खर्च कमी करतात. पावसाळ्यात सड्यांवर उगवणारी फुले, आंबा, काजू, भाजीपाला, कडधान्य इत्यादी सुमारे ६०/७० टक्के पिकांना परागीभवनासाठी आवश्यक मित्र कीटकांना मदत करतात. शेतीचे आणि बागांच्या उत्पादनात परिसरातील सड्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

World Environment Day - सड्यांची परिसंस्था म्हणजे कोकणची श्रीमंती
सिंधुदुर्ग सर्वप्रथम कोरोनामुक्त करा : मुख्यमंत्री ठाकरे

निसर्गयात्री संस्था तसेच डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. अरुणचंद्र चांदोरे, डॉ. अपर्णा वाटवे सडा आणि मानवी जीवन याचा अभ्यास करत आहेत असे सांगून रिसबुड म्हणाले, जांभा खडकांनीयुक्त या पठारांना स्थानिक भाषेत 'सडा' (Lateritic plateau)असे ओळखले जाते. या पठारांना कापून कोकणातील नद्या समुद्राला मिळतात. नद्यांमुळे सर्वसाधारणपणे ३ ते ४ किमी रुंद व लांबच लांब सपाट माथ्याच्या अनेक पठारांची निर्मिती झाली आहे. किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे या पठारांची उंची वाढत जाते.

पाणी धारण करण्याची क्षमता

कोकणातील जांभा खडकांच्या पठारांची पाणी धारण करण्याची क्षमता असामान्य आहे. त्याच्या सच्छिद्रपणामुळे त्यावर पडलेले पावसाचे अधिकतर पाणी सड्यावरील नैसर्गिक बारमाही तळी, शेकडोंच्या संख्येने असलेल्या पायऱ्यांच्या विहिरीत साठते. पुढे झऱ्यांच्या रूपाने नदी, तलाव, विहिरी यांना ते वर्षभर मिळते. कोकणात समुद्रकिनारपट्टी लगत वसलेल्या भागात पाण्याचा तीव्र दुष्काळ नसतो.

World Environment Day - सड्यांची परिसंस्था म्हणजे कोकणची श्रीमंती
'मी वसंतराव' कान्सच्या महोत्सवात, राहुल देशपांडेंची पोस्ट व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.