काळाचा घाला! तिच्यासाठी नववर्षाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं; कार झाडावर आदळून तरुणी जागीच ठार, दोघे जखमी

सिद्धार्थ याच्यासोबत ऐश्‍वर्याचे लग्न ठरले होते. काही महिन्यांनंतर दोघांचे लग्न होणार होते.
Car Accident Sawantwadi
Car Accident Sawantwadiesakal
Updated on
Summary

ऐश्वर्या हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे ती जागीच ठार झाली. यावेळी सिद्धार्थ व अन्य दोघे जखमी झाले.

सावंतवाडी : नववर्षाचे स्वागत (New Year Celebration) करण्यासाठी सावंतवाडीत (Sawantwadi) आलेल्या कुडाळ येथील तरुणीचा मोटार झाडाला आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ऐश्वर्या महेश कवठणकर (वय २१, रा. रामेश्वर प्लाझा, पिंगुळी) असे तिचे नाव आहे.

या अपघातात चालक सिद्धार्थ बांदेकर व अन्य दोघे जखमी झाले. ही घटना कोलगाव येथे आज पहाटे पाचच्या सुमारास घडली. कुडाळ येथून मित्रांसोबत नववर्ष सेलिब्रेशन आटोपून कुडाळकडे परतत असताना हा अपघात झाला.

याबाबत माहिती अशी : ऐश्वर्या ही तिचे मित्र सिद्धार्थ अशोक बांदेकर (कुडाळ बाजारपेठ, ता. कुडाळ), साहिल तेंडोलकर (रा. तेंडोली), निखिल लवू कवठणकर यांच्यासोबत मोटारीतून (एमएच ०७ क्यू ०२७८) नववर्ष स्वागतासाठी सावंतवाडीत आली होती. रात्री ११ च्या दरम्यान ते शहरात आले. येथे नववर्ष स्वागतासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी पाहिले. यानंतर तलावाकाठी गप्पा मारून पहाटे साडेचारच्या सुमारास माघारी परतले.

Car Accident Sawantwadi
Success Story : ..अखेर स्वप्न झालं पूर्ण! संसाराचा गाडा सांभाळत कष्टातून शीतल पाटलांची उपनिरीक्षकपदाला गवसणी

कोलगाव येथे पाचच्या सुमारास एका हार्डवेअर शोरूमसमोर रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांच्या मोटारीची धडक बसली. यात ऐश्वर्या हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे ती जागीच ठार झाली. यावेळी सिद्धार्थ व अन्य दोघे जखमी झाले. यावेळी सिद्धार्थ हा गाडी चालवत होता. वाहनावरील नियंत्रण सुटून हा प्रकार घडला. जखमी सिद्धार्थ याने आपले मामा राजू वाळके यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर वाळके आणि त्यांच्या सहकाऱ्‍यांनी धाव घेतली. मोटारीत अडकलेल्या तिघांना पत्रा तोडून बाहेर काढले.

साहिल तेंडोलकर याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वाळके यांनी ऐश्वर्याचे वडील महेश कवठणकर यांना अपघाताची माहिती दिली. ऐश्वर्या हिची काकी योगिता कवठणकर, काका यशवंत कवठणकर, चुलत भाऊ शुभम यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमलेल्या नातेवाइकांनी पोलिसांच्या मदतीने ऐश्वर्या हिला रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Car Accident Sawantwadi
विधवा प्रथा बंदीनंतर माणगाव ग्रामपंचायतीचा आणखी एक अनोखा उपक्रम; आता मुलीच्या लग्नात देणार 'संसारोपयोगी साहित्य'

यावेळी कुडाळ व कोलगाव परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची फिर्याद वडील महेश कवठणकर यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली. त्यानुसार दोघांच्या दुखापतीस व मुलगी ऐश्वर्या हिच्या मृत्यूस व मोटारीच्या नुकसानीस कारणीभूत असलेला चालक सिद्धार्थ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. ऐश्वर्या हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तिच्या मागे आई-वडील, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.

Car Accident Sawantwadi
'मला आमदारकीचा विजयी चौकार मारण्याची संधी दे'; कोल्हापूरच्या अंबाबाईला शिंदे गटाच्या आमदारानं घातलं साकडं

ते स्वप्न अखेर अधुरेच

सिद्धार्थ याच्यासोबत ऐश्‍वर्याचे लग्न ठरले होते. काही महिन्यांनंतर दोघांचे लग्न होणार होते; मात्र काळाने ऐश्वर्यावर घाला घातला. त्यामुळे दोन्ही कुटुंबे शोकसागरात बुडाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.