Road Accident : कामावरून घरी परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू; संकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत

ही घटना शिरोडा-वेंगुर्ले सागरी मार्गावर (Shiroda-Vengurla Sagarimarg) सागरतीर्थ बागकरवडी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.
Two Wheeler Accident on Shiroda-Vengurla Road
Two Wheeler Accident on Shiroda-Vengurla Roadesakal
Updated on
Summary

रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाले. त्यानंतर संकेतचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

वेंगुर्ले : मोपा विमानतळ (Mopa Airport) येथून कामावरून घरी परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात (Road Accident) सागरतीर्थ न्हैचीआड येथील तरुणाच्या मृत्यू झाला. संकेत किशोर पेडणेकर (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना शिरोडा-वेंगुर्ले सागरी मार्गावर (Shiroda-Vengurla Sagarimarg) सागरतीर्थ बागकरवडी येथे गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री घडली.

संकेत मोपा विमानतळावर कामाला होता. तो, गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कामावरून घरी येताना शिरोडा वेंगुर्ला मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे त्याची दुचाकी (एमएम ०७एके ६१२०) रस्त्याच्या डाव्या कडेला खाली गेली. तेथील लोखंडी गेट आदळली. याची माहिती मध्यरात्री अडीचच्या दरम्यान तेथून जाणाऱ्या टेम्पो चालकाने वेंगुर्ला पोलिसांना दिली.

Two Wheeler Accident on Shiroda-Vengurla Road
Sangli Loksabha : जयंतराव, विश्‍वजित यांची संजय पाटलांसमवेत 'सेटलमेंट'; भाजपच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप

गस्तीवरील हेड कॉन्स्टेबल बंड्या धुरी, सहायक उपनिरीक्षक रमेश तावडे व होमगार्ड घाडीगावकर घटनास्थळी दाखल झाले. संकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याला आपल्या वाहनातून शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Two Wheeler Accident on Shiroda-Vengurla Road
Ambabai Temple : अंबाबाई मूर्तीची झीज? पुरातत्त्‍व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी, अहवाल न्यायालयात होणार सादर

रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संकेतच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोपा विमानतळावरून कामावरून घरी परतत असताना कळणे करमळीवाडी (दोडामार्ग) येथील तरुणीचा गोवा कासारवर्णे येथे अपघाती जागीच मृत्यू झाला होता. यापाठोपाठ आता ही अशी दुसरी घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.