कोकणी तरुणाचा नाद खुळा! परिस्थितीशी दोन हात करुन जोपसला अभिनयाचा छंद

परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्याने कोणाकडेही हात न पसरता मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली
कोकणी तरुणाचा नाद खुळा! परिस्थितीशी दोन हात करुन जोपसला अभिनयाचा छंद
Updated on

बांदा : मिळेल ते रोजंदारीचे काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणारा येथील तरुण रुपेश श्रीकृष्ण माने (rupesh mane) (वय २४) हा परिस्थितीशी दोन हात करत आयुष्य जगत आहे. मात्र याही परिस्थितीत लहानपणापासूनच केवळ छंद म्हणून असलेली अभिनयाची आवड रुपेश या कोरोना महामारीच्या (corona) काळातही जोपासत आहे. छत्री दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या रुपेशने स्थानिक कलाकारांना हाताशी घेत युट्युबवर 'कोकण कला' (konkan kala) हा मालवणी बोलीभाषेतील चॅनेल सुरू केला आहे. या माध्यमातून त्याने कित्येक मालवणी नाटिका बांदा परिसरात चित्रित केल्या आहेत. त्याच्या या कलेला भरभरून प्रतिसाद मिळत असून लाईक्सचा पाऊस पडत आहे.

कोरोनाच्या सामूहिक प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला घेरले आहे. आर्थिक स्तर घसरल्याने यामध्ये सर्वाधिक भरडले गेले ते मध्यमवर्गीय व कामगार वर्ग. याचा फटका रुपेशलाही बसला. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्याने कोणाकडेही हात न पसरता मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. उन्हाळ्यात विहीर साफसफाई करण्याचे, सकाळच्या सत्रात गावागावात जाऊन मासे विक्री करण्याचे, जत्रोत्सव किंवा धार्मिक कार्यक्रमात दुकान लावणे, पावसाळ्यात छत्री दुरुस्त करण्याचे, घरोघरी जाऊन टीव्ही दुरुस्ती करण्याचे प्रसंगी गाडीवर चालक म्हणूनही त्याने काम केले आहे. परिस्थितीशी झगडताना त्याने कधीही नशिबाला किंवा दैवाला दोष दिला नाही. केवळ इमाने इतबारे त्याने मिळेल ते काम प्रामाणिकपणे केले. तो आपल्या पत्नीसह बांदा शहरात देऊळवाडी येथे राहतो. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने शिक्षण घेण्याच्या वयातच कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली. त्यामुळे परिस्थितीनुसार शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र त्यावरही मात करत रुपेश अत्यंत प्रगल्भपणे आज कलेच्या क्षेत्रात कार्य करत आहे.

कोकणी तरुणाचा नाद खुळा! परिस्थितीशी दोन हात करुन जोपसला अभिनयाचा छंद
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीचा सुवर्णवेध

उदरनिर्वाहासाठी तो सध्या छत्री दुरुस्तीचा व्यवसाय करतो. पोटासाठी कोणतेही काम छोटे नसल्याचे तो सांगतो. छत्री दुरुस्ती करताना किंवा मासे विक्री करताना प्रत्यक्ष लोकांनी आपले काम बघून आपल्या कलेला दिलेली दाद खुप समाधान देत असल्याचे रुपेश सांगतो. वेळप्रसंगी इतरांच्या अडीअडचणींना धावून जात तो मदतही करत असतो. रुपेश हा उत्तम कलाकार आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात रोजगारासाठी त्याची कला मनातच बंदिस्त झाली. मात्र कलेचा वेडेपणा हा कधीच स्वस्थ बसू देत नाही, हेच रुपेशच्या बाबतीत देखील घडले. दिवसा रोजंदारीची कामे करून त्याने रात्रीच्या वेळी दशावतारात काम करण्याचा निर्णय घेतला. दशावतारील त्याची शंकराची भूमिका चांगलीच गाजली. त्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास वाढला. आपण काहीतरी करू शकतो या भावनेने त्याने कोणाचेही मार्गदर्शन न लाभता स्थानिक कलाकारांना एकत्र घेऊन 'कोकण कला' हा युट्युब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

कलेला कोणतीही चौकट नसते. छोट्या छोट्या समाजीक संदेशातून देखील नाट्यनिर्मिती होऊ शकते हे त्याने दाखवून दिले. चित्रीकरणासाठी त्याने बांदा शहर व परिसरातील स्थळे निवडली. या स्थळांची प्रभावीपणे निवड केल्याने भविष्यात या स्थळांच्या पर्यटन विकासासाठी देखील निश्चितच फायदा होणार आहे. याकामी त्याला स्थानिक कलाकार संतोष तारी, शिवप्रसाद राऊत, राजू माने, सचिन माने यांचे सहकार्य मिळाले. रुपेश हा उत्तम कला दिग्दर्शक असल्याने तो स्वतःच उत्कृष्ट दिग्दर्शन करतो. भविष्यात कला दिग्दर्शन क्षेत्रात कार्य करण्याचा आपला मानस असून या माध्यमातून तळागाळातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणार असल्याचे रुपेश याने सांगितले.

कोकणी तरुणाचा नाद खुळा! परिस्थितीशी दोन हात करुन जोपसला अभिनयाचा छंद
मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.