सावंतवाडी संस्थानच्या युवराजांचा भाजपात जाहीर प्रवेश

Lakhmaraje Bhosale joins BJP
Lakhmaraje Bhosale joins BJPesakal
Updated on
Summary

विधानसभा मतदार संघाचा विचार करता इथं दीपक केसरकर यांची चांगली पकड आहे.

सावंतवाडी : येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले (Lakhmaraje Bhosle) यांनी आज मुंबई इथं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

भोसले यांच्या भाजपा (BJP) पक्षप्रवेशामुळं सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची (Sawantwadi Assembly Constituency) गणिते बदल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावंतवाडी राजघराणाच्या राजकीय वारसा लक्षात घेता राणी पार्वतीदेवी भोसले, शिवरामराजे भोसले यांनी आमदार म्हणून याठिकाणी काम केलंय. त्यानंतर आता युवराज लखमराजे भोसले यांनी राजकारणात पाऊल टाकल्यानं याठिकाणी भविष्यात वेगळं राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे.

Lakhmaraje Bhosale joins BJP
'शिवरायाचं राज्य प्रत्येकाच्या मनात आहे, हे कुणी सांगायची गरज नाही'

येथील विधानसभा मतदार संघाचा विचार करता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची चांगली पकड आहे. मात्र, राजघराण्याचं संबंध याठिकाणी चांगले असून युवराज लखमराजे यांच्या प्रवेशाचा भाजपला फायदा होऊ शकतो. त्यांच्या भाजप प्रवेशामुळं सावंतवाडी भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मुंबई इथं झालेल्या या प्रवेशावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.