हर्णै : हर्णै जिल्हा परिषद शाळा नं. १ च्या पहिलीच्या नव्या वर्गात शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून पहिलीच्या वर्गाचा पट वाढविण्यासाठी हर्णै शाळेने दुसऱ्यांदा शतक मारले आहे. दापोली तालुक्यातील हर्णै जि. प. शाळा क्र. १ या शाळेतील पहिलीच्या वर्गाच्या पटाने या वर्षी शतक पूर्ण केले आहे. एकीकडे जि. प. शाळेतील पटसंख्या कमी होत आहे. परंतु हर्णै शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत आहे.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात चक्क १०० नवीन विद्यार्थी दाखल झाले आहेत. शाळेत पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग असल्याने आणि पहिलीपासून उत्तम शिक्षण मिळत असल्याने पालकांचा या हर्णै नं. १ शाळेकडे ओढा वाढल्याचे दिसून आले. या सर्व पटवाढीसाठी केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार, मुध्याध्यापाक रूके तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर राणे, उपाध्यक्ष शेखर विलणकर आणि सर्व समिती सदस्य, हर्णै शाळेतील शिक्षकांनी पटसंख्या वाढीसाठी विशेष मेहनत घेतली. जयंत सुर्वे, वैशाली भोई, गटशिक्षण अधिकारी दापोली आणि विस्तार अधिकारी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. पाच वर्षांपूर्वीही पहिलीच्या वर्गाचा पट १०० झाला होता, असे शाळेतील कर्मचारी जयंत सुर्वे यांनी सांगितले.
गृहभेट देऊन उत्कृष्ट मार्गदर्शन
सेमी इंग्रजी असल्याने जवळच्याच शाळेत उत्तम शिक्षण, पालकांचा शिक्षकांवरील विश्वास, सर्व भौतिक सुविधा उपलब्ध, ऑनलाइन पद्धतीने अभ्यास चालू आहेच शिवाय गृहभेट देऊन उत्कृष्ट मार्गदर्शन, विविध शालेय उपक्रम, पालक संपर्क, पहिले पाऊल या उपक्रमाअंतर्गत १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत दोन महिने पहिलीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तयारी करून घेतली. म्हणूनच पट वाढण्यास चांगला प्रतिसाद पालकांकडून मिळाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.