खेळाडूंसाठी खुषखबर ; "टबाडा' ठरणार वरदान

Advanced Coaching Training Camp Organizing in kolhapur
Advanced Coaching Training Camp Organizing in kolhapur
Updated on

कोल्हापूर  : जिल्ह्यातील खेळाडूंनी खेळातील प्रावीण्याच्या जोरावर देशभरात नावलौकिक मिळवले आहे. त्यांच्या या लौकिकाला वाढवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऍडव्हान्स कोचिंग ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये "टबाडा' सारख्या जापनीज ट्रेनिंग प्रोग्रॅमचा समावेश पहिल्यांदाच केला आहे. यामुळे खेळाडूंमधील क्षमतेबरोबरच आत्मविश्वास वाढीसाठी मदत होणार आहे.

हे पण वाचा -   सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा... 

प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या खेळातील प्राविण्य वाढावे यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. अनेक तासांचा वेळ यासाठी खर्ची घालवला जातो. या त्याच्या मेहनतीचे चीज व्हावे या उद्देशाने "टबाडा' सारख्या जापनीज ट्रेनिंग प्रोग्रॅमचा समावेश केला आहे. यामध्ये 20 सेकंदाचा जोषपूर्ण व्यायाम आणि 10 सेकंदाचा ब्रेक असे सलग 8 सेट असा हा ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे. या मध्ये जोर, बैठका यासह अन्य व्यायाम प्रकाराचा समावेश आहे. यासह खेळाडूंना अद्ययावत तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, यासाठी जनरल ट्रेनिंग मेथड, स्पेसिपिक मेथड ट्रेनिंग, स्पोर्टस सायकोलॉजी, स्पोर्टस मेडीसीन, स्पोर्टस फिजिओथेरपि, डायट फॉर स्पोर्टसमन, अँटीडोपिंग, मडथेरपी, आईस थेरपी, वेट ट्रेनिंग असा अद्ययावत ट्रेनिंगचा समावेश करण्यात आला आहे.

हे पण वाचा -  काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार 

कोल्हापूर जिल्ह्यातून 342 खेळाडू हे शालेय राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत. त्यापैकी 132 खेळाडूंनी प्रविण्यप्राप्त केलेले आहे. या खेळाडूंना राष्ट्रीय,आंतराष्ट्रीय स्तरावर उच्चतम कामगिरी करता यावी, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या ट्रेनिंगचे खास आयोजन 15 ते ता 21 जानेवारीदरम्यान आदर्श गुरुकुल विद्यालय पेठवडगाव येथे करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला तंत्रशुद्ध आणि परिपूर्ण माहिती दिली जाईल. या शिवाय या ट्रेनिंगचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करण्यासाठी होणार आहे. यामध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना सहभागाची संधी आहे. यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने विशेष प्रयत्न केले असून, शाळांमध्ये या सहभागासंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे पण वाचा -   सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 


शारीरिक क्षमता वाढीसाठी विशेष कार्यक्रम
एखद्या खेळातील विजय अथवा पराजयावर हा खेळाडूच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणून शारीरिक क्षमता वाढीसाठी या विशेष कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. "टबाडा'सारखा ट्रेनिंग प्रोग्रॅम हा सर्वाधिक उपयुक्त ठरेल याच शंका नाही.
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.