Kanak Indersingh Gurjar : अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन

10 Year Old Girl Weightlifter Kanak Indersingh Gurjar
10 Year Old Girl Weightlifter Kanak Indersingh Gurjar esakal
Updated on

10 Year Old Girl Weightlifter Kanak Indersingh Gurjar : इंदरसिंह गुर्जर आणि धारीनी गुर्जर या वेटलिफ्टर जोडपे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहे. याच जोडप्याच्या अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने आपल्या आई - वडिलांच्या हातावर हात मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कनक इंदरसिंह गुर्जरने राज्यस्तरीय गुजरात वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत 102.5 किलो वजन उचलून सर्वांनाच अवाक केलं.

कनकने या वर्षीच्या मे महिन्यात मोटेरा स्टेडियमवर झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आता तिची जागतिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो शहरात ऑक्टोबर 30 ते नोव्हेंबर 5 होणार आहे. कनक 2 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेत भाग घेणार आहे.

10 Year Old Girl Weightlifter Kanak Indersingh Gurjar
IND vs SA 3rd ODI : श्रेयस अय्यरचा षटकार अन् भारताने मालिका घातली खिशात

पॉवरलिफ्टिंग हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार नाही. या खेळात स्क्वाट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारांचा समावेश असतो. इंदरसिंहने डिसेंबर 2021 मध्ये 75 किलो वजनीगटात सुवर्ण पदक पटकावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. स्पर्धेवेळी त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. तरी देखील त्याने दमदार कामगिरी केली. मात्र सुवर्णपदक विजेत्या इंदरसिंहला त्याच्या मुलीने मोठा आश्चर्याचा धक्का दिला.

इंदरसिंगने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी आणि माझी पत्नी मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या गुजरात स्टेट पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत अधिकारी म्हणून गेलो होते. त्यावेळी आमच्या मुलीने तिच्याच उंचीच्या मात्र तिच्यापेक्षा मोठ्या मुली वजन उचलताना पाहिले. यानंतर तिने आमच्याकडे हट्ट केला की मलाही वजन उचलायचं आहे. मला आश्चर्य वाटले की तिने कधी वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला नव्हता किंवा त्याचे प्रशिक्षणही घेतले नव्हते. तिने आम्हाला अजून एक मोठा धक्का दिला. तिने 102.5 किलो वजन उचलले.'

कनकचे वजन 37 किलो आहे. मात्र तिने 44 किलो वजनी गटात भाग घेतला. तिने 55 किलो डेडलिफ्ट पूर्ण केले. तर 30 किलो स्क्वाट आणि 17.5 किलो बेंच प्रेस असे एकूण 102.5 किलो वजन उचलले. तिने सुवर्ण पदक पटकावले.

10 Year Old Girl Weightlifter Kanak Indersingh Gurjar
BCCI President : गांगुली शर्यतीतून बाहेर! रॉजर बिन्नीपासून ते जय शाहपर्यंत हे दिग्गज मैदानात

इंदरसिंह यांनी सांगितले की, 'सर्वसाधारणपणे जीममध्ये आम्ही 12 वर्षाखालील मुलांना वजन उचलण्याची परवानगी देत नाही. त्यांना धावणे आणि साधे व्यायामप्रकार करण्यास सांगितले जाते. मात्र कनक माझ्यासोबत जीममध्ये येते आणि वजन उचलते.' मात्र इंदरसिंह आपल्या मुलाली जास्त वजन उचलू देत नाहीत. इंदरसिंह म्हणाला की, मी तिला थोडे स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ करण्यास सांगतो.'

कनक अभ्यास आणि सराव याचा समतोल कसा साधते असे विचारले असता इंदरसिंह म्हणाले की, 'कनक ज्या शाळेत आहे ती शाळा कनकच्या सरावाबाबत खूप सहकार्य करते. तिच्या शिक्षकांना माहिती आहे की कनक फ्लोरिडा येथील जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.