विराटला कसोटी क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण, किंग कोहलीचा खास Video

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 11 वर्षात अनेक विक्रम केले आहेत
11 years of Virat Kohli
11 years of Virat Kohlisakal
Updated on

11 years of Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आज कसोटी क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण झाली आहे. विराटने 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 11 वर्षात अनेक विक्रम केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटचा शानदार प्रवास या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. रन मशीन विराटने कसोटी क्रिकेटच्या पदार्पणनिमित्त त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 17 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

11 years of Virat Kohli
Ind vs Sa: ऑलराउंडरची समस्या संपली, टीम इंडियाचा बॅकअप प्लॅन तयार

टीम इंडियामध्ये 2011 साली विराट कोहलीने कसोटी पदार्पण केले होते. कोहलीने आतापर्यंत 101 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 49.95 च्या सरासरीने 8043 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 27 शतके आणि 28 अर्धशतके आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये नाबाद 254 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. हे सर्व क्षण कोहलीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत.

11 years of Virat Kohli
Ind vs Sa: पाऊस पडला मॅच रद्द, तिकिटाचे पैसे मिळणार पण किती?

विराट कोहली सध्या तरी खराब फॉर्ममधून जात आहे. जवळपास तीन वर्षांपासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. शेवटचे शतक त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत केले होते. विराटला या वर्षांत भलेही शतक झळकावता आले नाही. 1 ते 5 जुलै दरम्यान खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत विराट कोहली भारताकडून खेळताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.