India squad for World Test Championship final, England Tests: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship final) रंगणार आहे. इंग्लंडच्या मैदानातील मेगा फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंड (England) विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात 23 वर्षीय अर्जन नगवासवाला (Arzan Nagwaswalla) याला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. गुजरातचा हा युवा खेळाडू जलदगती गोलंदाज आहे. माजी जलदगती गोलंदाज हितेश मजूमदार यांच्या मते तो 140 किमी प्रति तास एवढ्या वेगाने गोलंदाजी करु शकतो.
अर्जन नगवासवाला याने आतापर्यंत 16 फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्या असून यात त्याच्या नावे 62 विकेट्सची नोंद आहे. लिस्ट-एमध्ये 20 सामन्यात त्याने 39 विकेट मिळवल्या आहेत. टी 20 मध्येही त्याने कमालीची कामगिरी नोंदवली आहे. 15 सामन्यात त्याच्या नावे 21 विकेट्स जमा असून 19 धावा खर्च करुन घेतलेल्या 6 विकेट ही त्याची टी-20 तीलसर्वोच्च कामगिरी आहे.
अर्जन नगवासवालाच्या नावाचा टीम इंडियात समावेश होताच एक ऐतिहासिक नोंदही झाली. 1975 नंतर पुरुषांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात एखादच्या पारशी क्रिकेटला संधी मिळाली आहे. यापूर्वी नारी कॉन्ट्रॅक्टर, पॉली उमरीगर, बेहरोज इडुल्जी, डायना इडुल्जी, रुसी सुर्ती आणि रुसी मोदी यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. फारुख इंजीनियर यांनी 1975 मध्ये भारताकडून खेळणारे शेवटचे पारशी क्रिकेटर होते. डायना इडुल्जी यांनी जुलै 1993 भारतीय महिला संघातून प्रतिनिधीत्व केले होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेस चाचणीनंतर फायनल विचार होणार ), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक, फिटनेस क्लीयरेंसनंतर विचार). स्टँडबाय खेळाडू: अभिमन्यु ईश्वर, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नागवासवाला. यातील प्रसिद्ध कृष्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असून तो इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता धूसर झालीये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.