Badminton Player Died: धक्कादायक! 17 वर्षीय बॅडमिंटनपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, पीव्ही सिंधूनेही व्यक्त केला शोक

17-year-old Badminton player died due to cardiac arrest: १७ वर्षीय बॅडमिंटनपटूने सामना खेळत असतानाच हृदयविकाराच्या झटका आल्याने जीव गमावल्याचे समोर आले आहे.
Zhang Zhi Jie
Zhang Zhi JieSakal
Updated on

17-year-old Badminton player died due to cardiac arrest: क्रीडा विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या १७ वर्षीय बॅडमिंटनपटूचे दुर्दैवी निधन झाले आहे. झँग झिजे असे त्याचे नाव असून त्याला सामना खेळत असतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याने अखेरचा श्वास घेतला.

रविवारी रात्री उशीरा आशिया ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेत जपानच्या काझुमा कवानो विरुद्ध खेळताना पहिल्या गेमवेळी तो अचानक कोर्टवर कोसळला. त्यानंतर तात्काळ त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला अँब्युलन्समधून जवळच्या हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले होते. पण अनेक प्रयत्नांनंतरही त्याचा जीव वाचवण्यात अपयश आले.

Zhang Zhi Jie
Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार इंडोनेशिया बॅडमिंटन असोसिएशनचे प्रवक्ते ब्रोटो हॅपी यांनी सांगितले, 'वैद्यकिय निष्कर्षानंतर त्याला आचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे समजत आहे.' तसेच प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार झँगचे पालक पुढील प्रक्रियेसाठी इंडोनेशियाला येत आहेत.

त्याच्या निधनाबद्दल जागतिक बॅडमिंटन फेडरेशननेही दु:ख व्यक्त केले आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही झँगच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून तिने सोशल मीडियावर लिहिले, 'मी झँगच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त करते. जगाने आत एक प्रतिभाशाली खेळाडू गमावला आहे.'

झँगच्या निधनाबद्दल चीन बॅडमिंटन असोसिएशननेही दु:ख व्यक्त केले आहे. झँग चीनचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू होता. दरम्यान त्याच्या निधनानंतर स्पर्धेत चीनचे खेळाडू काळी पट्टी दंडाला बांधून उतरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.