Paralympic 2024 Javelin Throw : दरारा... अजीत सिंगचे रौप्य अन् सुंदर सिंगचे कांस्य; भारताने मोडला पदकांचा विक्रम

Paralympic 2024 भारतीय खेळाडूंनी मंगळवारी मध्यरात्री दोन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई केली. या कामगिरीमुळे भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्वाधिक पदकांचा विक्रम मोडला.
Sunder gurjar
Sunder gurjaresakal
Updated on

Paralympic 2024 India Mens Javelin Throw F46 : सुमित अंतिलच्या सुवर्णपदकानंतर पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला भालाफेकीत आणखी दोन पदकं मिळाली. अजीत सिंग ( Ajeet singh) व सुंदर सिंग गुर्जर ( GURJAR Sundar Singh) यांनी पुरुषांच्या भालाफेक F46 गटात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या ३ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्य अशी एकूण २० झाली आहे. ही भारताची आतापर्यंतची पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्वोत्तम पदकसंख्या ठरली आहे. टोकियोत भारताने १९ पदकं जिंकली होती आणि तो विक्रम आज तुटला. Most Medals in Paralympic indian history

Men's Javelin Throw - F46 Final मध्ये भारताचे रिंकू हूडा, अजीत सिंग व सुंदर सिंग गुर्जर हे तीन खेळाडू होते. सुंदर हा F46 गटाच्या भालाफेकीत विश्वविक्रमाधारी आहे आणि तो दोनवेळचा माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. रिंकूने मागील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर अजीतही माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. नुकतेच या तिघांनी कोब येथे पार पडलेल्या जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता, तिथे रिंकून रौप्य, तर अजीतने कांस्य जिंकले होते. सुंदर सातवा आला होता. मागील वर्षी पॅरा आशियाई स्पर्धेतत सुंदरने ६८.६० मीटरच्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक नावावर केले होते. रिंकूने रौप्य व अजीतने कांस्य पटकावले होते.

Sunder gurjar
Paralympic 2024: गोल्ड हुकले, पण Sharad Kumar अन् मरियप्पन थंगवेलू यांनी भारतासाठी रौप्य व कांस्यपदक जिंकले

अजीतने पहिल्याच प्रयत्नात ५९.८० मीटर लांब भाला फेकला. रिंकूने ५७.५४ मीटर आणि गुर्जरने ६२.९२ मीटर लांब भाला फेकला. क्युबाचा गुईल्लेर्मो व्हॅरोना पहिल्या प्रयत्नानंतर ६३.६३ मीटरसह अव्वल स्थानी राहिला. अजीतचा दुसरा प्रयत्न ६०.५३ मीटर लांब पडला. क्युबन खेळाडूने दुसरा प्रयत्नात ६६.१४ मीटर लांब भाला फेकून प्रतिस्पर्धींना भरपूर मागे टाकले. अजीत ६२.३३ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर सरकला. भारताचे तिन्ही खेळाडू दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर पकड मजबूत करून होते. गुर्जरने चौथ्या प्रयत्नात ६४.९६ मीटर भाला फेकून रौप्यपदकावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

अजीतने पाचव्या प्रयत्नात ६५.६२ मीटर लांब अंतर भाला फेकून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली आणि दुसऱ्या क्रमांकावर कूच केली. क्युबन खेळाडूने ६६.१४ मीटरसह सुवर्णपदक जिंकले. अजीतने ६५.६२ मीटर या कामगिरीसह रौप्य, तर गुर्जरने ६४.९६ मीटरसह कांस्यपदक नावावर केले.

Sunder gurjar
Sumit Antil : लहानपणी वडील गेले, मोठेपणी पाय गेला; पण, एका पायावर तो जिद्दीने उभा राहिला अन् 'Golden Boy' बनला!

कांस्यपदक...

महिलांच्या ४०० मीटर T20 फायनलमध्ये दीप्ती जीवंजीकडून भारताला सुवर्णपदकाच्या आशा होत्या. २०२३च्या आशियाई स्पर्धेत तिने आशियाई रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले, तर २०२४च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड मोडून सुवर्ण जिंकले होते. पण, आज DEEPTHI JEEVANJI ने ४०० मीटर T20 शर्यतीत ५५.८२ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक नावावर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.