Google Trends 2021: लोकांचे लसीकरण स्लॉटपेक्षा आयपीएलवरच होते लक्ष

Google Trends 2021
Google Trends 2021esakal
Updated on

संपूर्ण जग 2021 ला निरोप देण्याच्या मागे लागले आहे. अनेक जण 2021 चा मागोवा घेण्याचाही प्रयत्न करत आहेत. दरम्यान, 2021 मध्ये लोकांनी गुगलवर काय सर्च (Google Search 2021) केले याची माहिती गुगलने गुगल ट्रेंड (Google Trends 2021) या वेबसाईटवर दिली आहे. 2021 मध्ये भारतात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) जोरात सुरु होते. लोक लसीकरणाच्या बुकिंगसाठी सातत्याने केंद्र सरकारची कोविन वेबसाईटला (CoWIN) भेट देत होते.

भारतात लसीकरणाचा गोंधळ सुरु होता त्यामुळे गुगल ट्रेंड्समध्ये कोरोना लसीरकरणासंबंधीत महत्वाची वेबसाईट कोविन (CoWIN) सगळ्यात जास्त ट्रेंडिगवर असेल असे आपल्याला वाटेल. पण, भारतात 2021 मध्ये सर्वाधिक ट्रेंडिंगवर होते ते इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League). त्यामुळे गुगल ट्रेंड्सनुसार तरी भारतात लोकांना लसीकरणापेक्षा आयपीएलमध्येच जास्त रस होता असे दिसते. (Google Trends 2021)

Google Trends 2021
Ashes : दुसऱ्या दिवशीही कांगारुंनी इंग्लंडला रडवले

2021 मध्ये आयपीएल (IPL) ही दोन टप्प्यात झाली होती. पहिला टप्पा हा 9 एप्रिल ते 2 मे दरम्यान झाला होता. त्यानंतर आयपीएलच्या बायो बबलमध्ये (Bio-Bubbles) कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती स्थगित करण्यात आली होती. भारतातील कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याने बीसीसीआयने उर्वरित आयपीएलचे सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये खेळली होती. आयपीएलचा हंगाम जवळपास 4 महिने चालला होता. या चार महिन्यातच आयपीएलने गुगल ट्रेंड्समध्ये (Google Trends 2021) कोविन वेबसाईटला मागे टाकले.

Google Trends 2021
आधी न्यूझीलंड आता विंडीजनेही पाकिस्तान दौरा अर्ध्यावर सोडला

भारतातील 2021 मध्ये पाच पैकी चार गुगल ट्रेंड्स क्रीडा विश्वातील

2021 गुगल ट्रेंड्समध्ये (Google Search 2021) आयपीएल (IPL), कोविन नंतर आयसीसी टी 20 वर्ल्डकप हा ट्रेंडिंगवर होता. त्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर युरो कप ट्रेंडिगवर होता. तर पाचव्या स्थानावर टोकियो ऑलिम्पिक ट्रेंडिगवर होते. भारतातील 2021 मधील टॉप पाच ट्रेंड्समधील चार ट्रेंड्स हे क्रीडा विश्वातील होते. 2021 मध्ये कोरोनातून सावरणाऱ्या जगाला क्रीडा स्पर्धांनी एक आत्मविश्वास देण्याचे काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.