2026 FIFA World Cup : न्यूयॉर्कमध्ये रंगणार अजिंक्यपदाची लढत; २०२६ मधील फुटबॉल विश्‍वकरंडकाचे बिगुल वाजले

अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या तीन देशांमध्ये २०२६ चा फिफा विश्‍वकरंडक रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या करंडकाचे बिगुल सोमवारी दणक्यात वाजले. अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यूजर्सी येथे या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला होणार आहे.
2026 FIFA World Cup championship takes place in new york football sport
2026 FIFA World Cup championship takes place in new york football sportSakal
Updated on

नवी दिल्ली : अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या तीन देशांमध्ये २०२६ चा फिफा विश्‍वकरंडक रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या करंडकाचे बिगुल सोमवारी दणक्यात वाजले. अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यूजर्सी येथे या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला होणार आहे.

तसेच टोरंटो (कॅनडा), मेक्सिको सिटी (मेक्सिको) व लॉस एंजिलिस (अमेरिका) या तीन ठिकाणी सलामीच्या लढतींचा थरार रंगणार आहे. ११ जूनला मेक्सिको येथे या स्पर्धेचा श्रीगणेशा होईल. फुटबॉल विश्‍वकरंडकाची रंगत ११ जून ते १९ जुलै २०२६ या दरम्यान पाहायला मिळणार आहे.

फुटबॉल विश्‍वकरंडकात पहिल्यांदाच ४८ देशांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे २०२६ च्या विश्‍वकरंडकात तब्बल १०४ लढतींचा धमाका अनुभवायला मिळणार आहे. अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या यजमान देशांच्या साखळी फेरीच्या लढतीत त्यांच्याच देशात खेळवण्यात येणार आहेत.

अमेरिकेच्या लढती सीटल येथे होतील. मेक्सिको देशाच्या लढती ग्वाडलाजरा येथे पार पडतील. तसेच कॅनडा देशाच्या लढती वॅनकोवर येथे आयोजित करण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये होणार लढती : अटलांटा, बॉस्टन, डल्लास, ग्वाडलाजरा, हॉस्टन, कानसास सिटी, लॉस एंजिलिस, मेक्सिको सिटी, मियामी, माँटेरी, न्यूयॉर्क न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, सॅन फ्रॅन्सिस्को बे एरीया, सीटल, टोरंटो व वॅनकोवर.

दिवसाला चार अन्‌ सहा सामने

२०२६ मधील विश्‍वकरंडकातील संख्या वाढवून ४८ करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच सामन्यांची संख्याही वाढली आहे. साखळी फेरीच्या पहिल्या दोन दिवसांव्यतिरिक्त दिवसाला चार सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच साखळी फेरीच्या अखेरच्या चार दिवसांमध्ये प्रत्येकी सहा लढती खेळवण्यात येणार आहेत. अंतिम ३२ संघांच्या फेरीत दिवसाला तीन लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

कॅनडामध्ये पहिल्यांदाच आयोजन

कॅनडा येथे पहिल्यांदाच पुरुषांच्या फुटबॉल विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच अमेरिकेत दुसऱ्यांदा पुरुषांचा विश्‍वकरंडक होणार आहे. याआधी १९९४ मध्ये अमेरिकेत फुटबॉल विश्‍वकरंडक खेळवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.