Ind Vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान झाला असाही एक रेकॉर्ड; 'स्विगी'वरून लोकांनी ऑर्डर केले 'इतके' कंडोम
वनडे क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मधील हायव्होल्टेज सामन्यात काल भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. यादरम्यान ऑनलाइन फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने शनिवारी झालेल्या भारत पाक सामन्यादरम्यान ३,५०९ कंडोम्स ऑर्डर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
स्विगीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. "आज काही खेळाडू खेळपट्टीवर खेळत आहेत" अशी मिश्कील पोस्ट स्विगीने केली आहे. या पोस्टवर ड्युरेक्स इंडियाने देखील मजेशीर कमेंट केली. आम्हाला आशा करतो की ३५०९ जणांनी चांगलं परफॉर्म केलं असेल. दरम्यान या पोस्टखाली अनेक नेटकरी देखील व्यक्त होत आहेत.
सामन्यात काय झालं?
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान विरोधात एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाने स्पर्धेतील आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. पाकिस्तानने ठेवलेले 192 धावांचे आव्हान पार करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा ठोकल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं.या सामन्यात भारताकडून प्रमुख पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकिस्तानी फलंदाजीचं कंबरडं मोडलं.
पॉइंट्स टेबलमध्ये भारत अव्वल
भारताने पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपला तिसरा सामना जिंकला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचला. भारतासोबतच न्यूझीलंडचे देखील सहा गुण झाले आहेत. मात्र त्यांचे नेट रनरेट हे +1.604 इतके आहे. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्याने भारताचे नेट रनरेट हे + 1.821 इतके आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.