पाकमध्ये गोळीपासून संरक्षण कोरोनापासून नाही; विंडीज संघ कोरोनाग्रस्त!

विंडीज संघ कोरोनाग्रस्त! पाकमध्ये गोळीपासून संरक्षण मात्र कोरोनापासून नाही?
Pakistan West Indies Cricket Team
Pakistan West Indies Cricket Teamesakal
Updated on

इस्लामाबाद : वेस्ट इंडीजचा संघ (West Indies Cricket Team)सध्या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे या दौऱ्यासाठी पाकिस्तानने वेस्ट इंडीज संघाला कडेकोट बंदबस्त दिला. मात्र पाकिस्तानात दाखल झालेला वेस्ट इंडीजचा संघ (West Indies Cricket Team) सुरक्षेच्या कारणास्तव नाही तर कोरोनामुळे (Corona) धोक्यात आला आहे.

Pakistan West Indies Cricket Team
डिव्हिलियर्स सह दिग्गजांवर वर्णभेदाचे आरोप

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या विंडीज संघातील आणखी तीन खेळाडू कोरोनाबाधित झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून बुधवारी करण्यात आलेल्या कोरोना चाचणी शाय होप(Shai Hope), अकील हुसैन(Akeal Hosein) आणि जस्टीन ग्रीव्स (Justin Greaves) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (6 West Indies Cricket Team Member Tested Corona Positive)

Pakistan West Indies Cricket Team
Team India दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

याचबरोबर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आणि फिजिशियन यांचा देखील कोरोना (Corona) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाग्रस्त झालेल्या या पाचही जणांना सध्या विलगीकरणात ठेवले आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी सांगितले की या जोपर्यंत कोरोनाग्रस्त तीन खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह येणार नाही तोपर्यंत ते पुढील सामन्यात खेळणार नाहीत.

यापूर्वीही वेस्ट इंडीज (West Indies) संघाच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल, रोस्टन चेस आणि काईल मायेर्स यांनाही पाकिस्तान दौऱ्यावर कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या आता 6 वर पोहचली आहे.

Pakistan West Indies Cricket Team
'आधी देशाचा विचार करा' कपिल देव यांचा विराट - सौरभला सल्ला

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा (West Indies Tour Of Pakistan)

13 डिसेंबर पहिला टी 20 सामना

14 डिसेंबर दुसरा टी 20 सामना

16 डिसेंबर तिसरा टी 20 सामना

एकदिवसीय मालिका 18 डिसेंबर पासून सुरु

18 डिसेंबर पहिला एकदिवसीय सामना

20 डिसेंबर दुसरा एकदिवसीय सामना

22 डिसेंबर तिसरा एकदिवसीय सामना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.