73 व्या प्रजासत्ताक दिनीही उपेक्षाच; खाशाबा जाधवांना सरकार पुन्हा विसरलं

First Olympic individual Medalist Khashaba Jadhav
First Olympic individual Medalist Khashaba Jadhavesakal
Updated on

भारत आज आपला 73 वा प्रजासत्ताक दिन (73rd republic day 2022) साजरा करत आहे. केंद्र सरकारने नुकतीच पद्म पुरस्करांची घोषणा केली. मात्र ही घोषणा महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील कुस्ती प्रेमींसाठी निराशादायक ठरली. कारण १९५२ लाच स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू ( Wrestler) खाशाबा जाधवांकडे (First Olympic individual Medalist Khashaba Jadhav) पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णवेध घेतला त्यावेळी संपूर्ण देशात एक आनंदाची लहर उठली होती. ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने देशासाठी दुसरे वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले होते. मात्र ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक जिंकण्याची पायाभरणी कुस्तीपटू खाशाबा जाधवांनी (Khashaba Jadhav) १९५२ मध्येच केली होती. आज नीरज चोप्राला पदक जिंकल्यानंतर दुसऱ्याच वर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. मात्र ७० वर्षे झाली खाशाबा जाधवांची उपेक्षाच होत आहे. (70 years of injustice about First Olympic individual Medalist Khashaba Jadhav)

First Olympic individual Medalist Khashaba Jadhav
खाशाबा जाधवांना पद्म पुरस्कार द्या; अमोल कोल्हेंची गृहमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान, यंदा कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते पै. संग्रामसिंह कांबळे, कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापूर शहर अध्यक्ष वस्ताद बाबाराजे महाडिक, स्व.खाशाबा जाधव (Khashaba Jadhav Son) यांचे चिरंजीव रणजित जाधव (Ranjit Jadhav) यांनी खाशाबा जाधवांना पद्म पुरस्कार देण्यासाठी एक मोहिम उघडली होती. या वेळी त्यांनी खासदार संभाजी राजे, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट देखील घेतली होती. या सर्व खासदारांनी संबंधित खात्याकडे पाठपुरावा देखील केला होता.

First Olympic individual Medalist Khashaba Jadhav
पै. खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळवून देऊ : संभाजीराजे छत्रपती

यंदाच्या वर्षी तरी खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली होती. या मागणीसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी ट्वीटरवर #PadmaForKhashabaJadhav या हॅशटॅगने मोहीम उघडली. त्याला तरुणांचा प्रतिसाद लाभला. अनेकांनी ऋतुराज पाटील यांचे हे ट्विट रिट्विट केले असून शेकडो लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.

First Olympic individual Medalist Khashaba Jadhav
भारताचे पहिले ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना पद्मभूष देण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर मोहीम 

मात्र यंदाही सरकारी पातळीवर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांची उपेक्षा करण्याच्या सिलसिला सुरूच राहिला. १९५२ च्या ऑलिंपिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये (Free Style Wrestling) स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकणारे खाशाबा जाधव हे पहिले खेळाडू होते. असे असूनही त्यांचा यथोचित सन्मान झाला नसल्याची भावना सर्वच क्रीडाप्रेमींमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.