75th Independence Day : स्वातंत्र्याचे पहिले वर्ष अन् हॉकी टीमची देशाला 'सुवर्ण' भेट

75th Independence Day 2022 Iconic Sports Moment After Independence Indian Hockey Team Won Gold Medal In 1948 London Olympics
75th Independence Day 2022 Iconic Sports Moment After Independence Indian Hockey Team Won Gold Medal In 1948 London Olympicsesakal
Updated on

75th Independence Day : भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षं पूर्ण करत आहे. या 75 वर्षात भारताने अनेक क्षेत्रातील शिखरे पादाक्रांत केली आहेत. भारताने क्रीडा क्षेत्रातही आपला दबदाबा वाढवला आहे. भारत सध्या नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट आणि आता अॅथलेटिक्समध्ये देखील आपले नाणे खणखणीत वाजून दाखवत आहे. ज्या ज्या वेळी भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा (Iconic Sports Moment After Independence) आढावा घेतला जातो त्या त्या वेळी भारताने 1983 साली जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट वर्ल्डकपचा (1983 World Cup) अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. मात्र त्यापूर्वीही भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) देशाला स्वातंत्र्यानंतर पहिल्याच वर्षात सुवर्ण भेट दिली होती.

75th Independence Day 2022 Iconic Sports Moment After Independence Indian Hockey Team Won Gold Medal In 1948 London Olympics
Ross Taylor : राजस्थान रॉयल्सच्या मालकाने कानशिलात लगावल्या; टेलरचा खळबळजनक दावा

भारतीय हॉकी संघाने 12 ऑगस्ट 1948 रोजी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक (London Olympics 1948 Gold Medal) जिंकून क्रीडा जगताला स्वतंत्र भारताची ओळख अभिमानाने करून दिली होती. किशन लाल यांच्या नेतृत्वातील भारतीय संघात बलबीर सिंह (सिनियर), रणधीर सिंह जेंटले आणि लेसली क्लाउडीस अशा दिग्गज हॉकीपटूंनी भारताचा तिरंगा लंडनमध्ये रोवला होता.

विशेष म्हणजे भारतीय संघाने ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्यांच्या पासून आपण स्वातंत्र्य मिळवले त्या ब्रिटनला त्यांच्याच मायदेशात पराभवाची धूळ चारली होती. भारताने हा सामना 4 - 0 असा एकतर्फी जिंकत आपले वर्ल्ड टायटल अबाधित राखले होते. भारताने ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रिया, अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यावर विजय मिळवला होता. तर सेमी फायनलमध्ये भारताने नेदरलँडचा 2 - 1 असा पराभव केला होता.

75th Independence Day 2022 Iconic Sports Moment After Independence Indian Hockey Team Won Gold Medal In 1948 London Olympics
MS Dhoni Mentor : मेटॉर होणं पडणार महागात; बीसीसीआयची धोनीला तंबी

ब्रिटनविरूद्धच्या अंतिम सामन्यात सातत्याने पावसाच्या धारा कोसळत होत्या. त्यामुळे मैदानात चिखल देखील झाला होता. मात्र अशा परिस्थितीत देखील भारतीय संघाने दर्जेदार कामगिरी करत ब्रिटनला लोळवले. जर ब्रिटनकडे ब्रॉडी सारखा गोल किपर नसता तर भारताने अजून मोठ्या गोलफरकाने ब्रिटनचा पराभव केला असता. मात्र ब्रॉडीने भारताची अनेक आक्रमणं यशस्वीरित्या परतवून लावली.

विशेष म्हणजे भारतीय हॉकी संघाने 1948 लंडन ऑलिम्पिकमध्ये इतिहासातील आपली सर्वोत्तम ऑलिम्पिक कामगिरी केली. भारतीय संघाने 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एकूण 25 गोल केले. तर इतर संघाला भारताविरूद्ध फक्त 2 गोलच करता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.