विराट कोहलीनं वापरलेली अलिशान Lamborghini कार विक्रीला

दुसऱ्या बाजुला त्याने वापरलेल्या कारची जोरदार चर्चा सुरु आहे.
विराट कोहलीनं वापरलेली अलिशान Lamborghini कार विक्रीला
Updated on

विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानातील आपल्या कामगिरीसह मैदानाबाहेरील गोष्टींमुळेही चर्चेत असतो. भारतीय टी-20 संघासह आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधारपद सोडल्यामुळे विराट चर्चेत आहे. दुसऱ्या बाजुला त्याने वापरलेल्या कारची जोरदार चर्चा सुरु आहे. अलिशान स्पोर्ट्स कार वापरण्याचा छंद बाळगणाऱ्यांना विराटने वापरलेली लॅम्बॉर्गिनी (Lamborghini) कार खरेदी करता येणार आहे.

टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने वापरलेली अलिशान कार कोच्चिच्या एका शोरूम विक्रीसाठी बाजारात आणली आहे. सध्याच्या घडीला या लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो स्पायडर कारची किंमत 1.35 कोटी इतकी आहे. ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रति तास स्पीड अवघ्या 4 सेकेंदात पकडते.

विराट कोहलीनं वापरलेली अलिशान Lamborghini कार विक्रीला
IPL 2021: 'पोलार्ड नक्की काय करत होता?' माजी क्रिकेटपटूचा सवाल

एका ऑटोमोटिव्ह वेबसाइटच्या वृत्तानुसार, कोहलीने 2015 मध्ये ही अलिशान कार खरेदी केली होती. काही काळासाठी कार वापरल्यानंतर विराटने ही कार विकली होती. कोच्चीतील 'रॉयल ड्राइव्ह' कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विराट कोहलीने वापरलेली कार विक्रीला ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विराट कोहलीनं वापरलेली अलिशान Lamborghini कार विक्रीला
IPL 2021: हार्दिक पांड्या संघात का नव्हता? कोचने दिलं उत्तर

ही कार केवळ 10 हजार किलोमीटर चालवण्यात आली आहे. अलिशान सेलिब्रिटी कार 2013 मॉडलची असून कोलकाताच्या एका डिलरकडून ही कार कोच्चीच्या शोरुममध्ये आणण्यात आली आहे. 560 हॉर्सपावरची ही कार 324 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. लॅम्बॉर्गिनीने 2014 मध्ये या कारचे उत्पादन बंद केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.