Jasprit Bumrah IPL : आयपीएल नाही इराणी ट्रॉफी खेळ... चोप्राने बुमराहवर काढला जाळ

Jasprit Bumrah IPL
Jasprit Bumrah IPL esakal
Updated on

Jasprit Bumrah IPL : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीचा कणा आहे. मात्र गेल्या काही काळापासून तो पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर आहे. मध्यंतरीच्या काळात तो फिट झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली. त्यानंतर आता तो उर्वरित दोन कसोटी आणि वनडे मालिकेसाठी देखील मुकला आहे.

Jasprit Bumrah IPL
IPL 2023 Telecast : अंबानी फ्री मध्ये दाखवणार IPL, मोजली मोठी रक्कम, इथे पाहता येणार मोफत सामने

दरम्यान, जसप्रीत बुमराह आता थेट आयपीएलमध्येच खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. याबाबत माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने देखील जसप्रीत बुमराहचा कान पिळला. तो म्हणाला की, आयपीएलचे 7 सामने न खेळल्यास जगबुडी होणार नाहीये. आयपीएल खेळणे हा एकमेवर उद्येश असू नये. तुम्ही पहिल्यांदा भारतासाठी आहात मग फ्रेंच्याजी क्रिकेटसाठी!

चोप्रा म्हणाला की, 'तुम्ही पहिल्यांदा भारतीय खेळाडू आहेत त्यानंतर तुम्ही फ्रेंचायजी क्रिकेट खेळू शकता. जर तुम्ही आयपीएलचे 7 सामने खेळले नाहीत तर आभाळ कोसळणार नाहीये. जर बुमराहला गोलंदाजी करताना थोडी जरी अडचण येत असेल तर त्याला बीसीसीआयने आयपीएल खेळण्यापासून रोखले पाहिजे.'

Jasprit Bumrah IPL
Shoaib Akhtar Babar Azam : बाबरची लायकी विराट एवढी नाही; शोएब अख्तरनेच केला पाणउतारा

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, जर बुमराह फिट आहे तर त्याला इराणी ट्रॉफी किंवा काऊन्टी क्रिकेटमध्ये जाऊन खेळले पाहिजे. आयपीएल अजून एक महिना दूर आहे. आपल्याला हे देखील महिती नाही की तो सगळे सामने खेळले की नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल अजून तीन महिने लांबल आहे. त्यामुळे बुमराहबाबत जो काही निर्णय घेण्यात येईल तो विचारपूर्वक आणि संघाच्या हित लक्षात घेऊन घ्यावा.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.