Ab de villiers And Sachin Tendulkar : दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची भेट घेतली. सचिनला भेटण्यापूर्वी आणि नंतर डिव्हिलियर्सने आपली इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहे. डिव्हिलियर्स म्हणाला की, मी नेहमी सचिनला फॉलो करतो. सचिन अशी व्यक्ती आहे, ज्याला भेटण्यासाठी मी उत्सुक होतो.
मुंबईचा वडापावचा नाष्टा करत या दोन क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये चर्चा रंगली. डिव्हिलियर्सने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, सचिन त्याच्या खेळाच्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे स्वतःला मैदानावर आणि मैदानाबाहेर सिद्ध करत होता ते अविश्वसनीय होते. सचिनच्या निवृत्तीनंतरही काहीही बदलले नाही. तो अजूनही डिव्हिलियर्ससह जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत असतो.
या दोन दिग्गजांच्या भेटीचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही, तरी या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला. डिव्हिलियर्स नुकताच बेंगळुरूमध्ये आला होता. पुढील आयपीएल हंगामात तो आरसीबी संघासोबत खेळताणा दिसण्याची शक्यता आहे. आरसीबी संघाने 3 नोव्हेंबरला एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये डिव्हिलियर्स म्हणाले, "पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी मी आरसीबीच्या लोकांशी गप्पा मारण्यासाठी आलो आहे."
डिव्हिलियर्स 2011 ते 2021 पर्यंत 157 सामन्यांमध्ये आरसीबीचा भाग होता. त्याने 41.10 च्या सरासरीने 4,522 धावा केल्या. त्याने संघासाठी 158 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने दोन शतके आणि 37 अर्धशतके केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.