AB de Villiers Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार, 360 डिग्री खेळाडू म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलियर्स हा विराट कोहलीचा चांगला मित्र आहे. हे दोघं बराच काळ आरसीबीकडून एकत्र खेळले आहेत. यांच्यातील ब्रोमान्स सर्वांना माहिती आहेच. विराट आणि डिव्हिलियर्स हे एकमेकांची स्तुती करताना थकत नाहीत.
मात्र एबी डिव्हिलियर्सला तुझ्या मते टी 20 क्रिकेट इतिहासातील ग्रेटेस्ट खेळाडू कोण असे विचारले असता त्याने आपल्या जिगरी दोस्ताचे नाव न घेता तिसऱ्याचेच नाव घेतले.
सुपर स्पोर्ट्सशी बोलताना एबी म्हणाला, 'माझ्या मते टी 20 क्रिकेटमधील ग्रेटेस्ट खेळाडू हा दुसरा तिसरा कोणी नसून तो राशिद खान आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपले योगदान देतो. दो गोलंदाजी आणि फलंदाजीत मॅच विनर ठरतो. तो क्षेत्ररक्षणातही चपळ आहे. त्याच्याकडे सिंहासारखं ह्रदय आहे. तो कायम जिंकायचाच प्रयत्न करतो. तो खूप स्पर्धात्मक पद्धतीने खेळतो. तो ग्रेट टी 20 खेळाडू होण्यास पात्र आहे.'
राशिद खानबद्दल बोलायचं झालं तर त्याने 2017 मध्ये आयपीएल फ्रेंचायजी सनराईजर्स हैदराबादकडून खेळण्यास सुरूवात केली. त्याने कमी कालावधीतच आपला प्रभाव पाडला. पदार्पणाच्या हंगामातच त्याने 14 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या. राशिद 2017 ते 2021 पर्यंत हैदराबादकडून खेळला. त्याने या काळात 93 विकेट्स घेतल्या.
यानंतर राशिद खानने गुजरात टायटन्सकडून खेळण्यास सुरूवात केली. त्याने गुजरातकडून 2022 च्या हंगामात 19 विकेट्स घेतल्या. राशिद खानने 77 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यांमध्ये 126 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.