Ab de Villiers : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने जागतिक क्रिकेटला एक इशारा दिला आहे. एबी डिव्हिलियर्सने सध्याच्या क्रिकेट व्यवस्थेत खेळाडूंना तीन फॉरमॅट खेळण्यासाठी प्रेरित करणे खूप अवघड जाणार असल्याचे सांगितले. कारण थकवणारे क्रिकेट कॅलेंडर आहे. डिव्हिलियर्सने क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेटपटूंना कोणता फॉरमॅट खेळावा याबाबत प्रामाणिक चर्चा होणे गरजेचे आहे.
डिव्हिलियर्स म्हणाला की, आपल्या कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवण्यासाठी खेळ सोडला, जे सर्व स्वरूपाच्या आधुनिक क्रिकेटपटूसाठी लक्झरी बनले आहे. आंतरराष्ट्रीय कॅलेंडर आणि जगभरातील T20 लीगची नेहमीच गर्दी लक्षात घेता, दरम्यानच्या विश्रांतीशिवाय तिन्ही फॉरमॅट खेळणे अशक्य झाले आहे.
डीव्हिलियर्सने पीटीआयला सांगितले की, अथक वेळापत्रकानुसार फॉरमॅट निवडण्याची गरज आहे. "कारण मला फक्त एक किंवा दोन फॉरमॅट सोडून द्या असे म्हणणारा माणूस व्हायचे नाही. आणि पुन्हा एकदा, खेळाडूंना त्यांच्या देशांसाठी खेळाचे सर्व फॉरमॅट खेळण्यासाठी प्रेरित करणे ही सध्या जागतिक क्रिकेटची समस्या आहे."
तो पुढे म्हणाला की "परंतु मला वाटते की जगभरातील विविध मंडळांमध्ये खेळाडूंना ओळखण्यासाठी, सामुदायिक चर्चा आणि खेळाडूंशी लवकरात लवकर संवाद साधून, त्यांना काय साध्य करायचे आहे हे समजून घेण आवश्यक आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या देशाच्या संघात कोणत्या रोलमध्ये फिट बसतात.'
डिव्हिलियर्स म्हणाला की, खेळाडूंना जगभरातील लीग खेळण्याचा आनंद मिळणे गरजेचे आहे. अनुभव मिळवण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. या लीगमुळेच सूर्यकुमार, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि स्वतः मी आमचा खेळ एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊ शकलो.
आपल्याला काय साध्य कारयचं आहे ते शक्य आहे की नाही हा महत्वाचं आहे. जर खेळाडू एखाद्या फॉरमॅटमध्ये कमी पडत असेल तर किंवा एक दोन फॉरमॅट खेळण्यात उत्सुक नसेल तर याबाबत चर्चेची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.