आता अभिमन्यू जगातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर

यापूर्वी हा विक्रम रशियाच्या सर्जी सर्गेई याच्या नावावर होता.
Abhimanyu Mishra
Abhimanyu Mishra Twitter
Updated on

सर्वात कमी वयात बुद्धिबळातील शिखर गाठण्याचा विश्वविक्रम आता अभिमन्यू मिश्राच्या नावे झाला आहे. तब्बल 19 वर्षे रशियाच्या सर्गेई कार्याकिनच्या नावे असलेला विक्रम मोडीत काढत अभिमन्यू मिश्राने नवा किर्तीमान प्रस्थापित केलाय. न्यू जर्सीचा अभिमन्यू याने 12 वर्षे 4 महिने आणि 25 दिवस वयात ग्रँडमास्टर होण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. यापूर्वी हा विक्रम रशियाच्या सर्जी सर्गेई याच्या नावावर होता. सर्गेईने 12 आॕगस्ट 2002 मध्ये जगातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम रचला होता. त्याने 12 वर्ष 7 महिने वयात मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं होतं. (Abhimanyu Mishra is now the worlds youngest Grandmaster)

यापूर्वी अभिमन्यूने नोव्हेबर 2019 मध्ये 10 वर्षे 9 महीने आणि 3 दिवस वयाचा असताना जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय मास्टर बनला होता. त्याने भारताचा प्रज्ञानंद याचा विक्रम मागे टाकला होता. ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने 30 मे 2016 मध्ये 10 वर्षे 9 महीने आणि 20 दिव वयात आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब मिळवला होता.

Abhimanyu Mishra
'खेलरत्न' पुरस्काराच्या शर्यतीतील 10 खेळाडू

या वर्षीच्या एप्रिलपासूनच अभिमन्यू आपल्या वडिलांसोबत हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टमध्ये आहे. दोन महिन्यात दोन नॉर्म मिळवणाऱ्या अभिमन्यूने भारतीय बुद्धीबळपटू लिओन मेंडोंका याच्याविरुद्धच्या लढतीत बुधवारी अंतिम नॉर्म मिळवत जगातील सर्वात कमी वयातील ग्रँडमास्टर होण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. बुद्धीबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर झाल्यानंतरचा पुढील टप्पा असतो तो ग्रँडमास्टर. हा टप्पा पार करणं खूपच कठीण असतं. काही कठोर नियम आणि अटीनुसार 2500 एलो रेटिंग मिळवणाऱ्या खेळाडूला ग्रँडमास्टर किताब मिळतो. सर्वात लहान वयात ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम आता अभिमन्यू वर्माच्या नावे झाला आहे. .

सर्वात कमी वयाचे ग्रँडमास्टर

1. अभिमन्यू मिश्रा (न्यू जर्सी) 12 वर्षे 4 महिने आणि 25 दिवस

2. सर्गेई कार्याकिन (रशिया) – 12 वर्ष 7 महिने

3) गुकेश दोम्माराजू (भारत)- 12 वर्ष 7 महिने 17 दिवस

4) जोव्होखीर सिंदारोव्ह (उझबेकिस्तान)- 12 वर्ष 10 महिने 5 दिवस

5) प्रज्ञानंद रमेशबाबू (भारत)- 12 वर्ष 10 महिने 13 दिवस

6) नोदीर्बेक अब्दुसत्तारोव्ह (उझबेकिस्तान)- 13 वर्ष 1 महिना 11 दिवस

7) परिमार्जन नेगी (भारत)- 13 वर्ष 4 महिने 22 दिवस

8) मॕग्नस कार्लसन (नाॕर्वे)- 13 वर्ष 4 महिने 27 दिवस

9) वेई यी (चीन)- 13 वर्ष 8 महिने, 23 दिवस

10) रौनक सिधवानी (भारत)- 13 वर्ष 9 महिने 28 दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.