Abu Dhabi T10 League: डेक्कन ग्लेडिएटर्सने अबू-धाबी टी 10 लीगच्या पाचव्या हंगामाचे जेतेपद पटकावले आहे. शनिवारी ग्लेडिएटर्स आणि दिल्ली बुल्स यांच्यात फायनलचा सामना रंगला होता. यात ग्लेडिएटर्सनं 56 धावांनी विजय नोंदवत जेतेपदावर नाव कोरले. डेक्कन ग्लेडिएटर्सच्या विजयात कॅरेबियन अष्टपैलू आंद्रे रसेलनं मोलाचा वाटा उचलला. मसल पॉवर रसेलनं 32 चेंडूत 90 धावांची धमाकेदार खेळी केली.
टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाज करताना डेक्कन ग्लेडिएटर्सने 10 षटकात एकही विकेट न गमावता 159 धावा केल्या होत्या. यात आंद्रे रसेलने 32 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने नाबाद 90 धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूला इंग्लिश फलंदाज टॉम कोहलर-कॅडमोरने 28 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 59 धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी केलेली 159 धावांची भागीदारीसह रसेल आणि कॅडमोर जोडीनं टी 10 लीगच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केलाय. त्यांनी केलेली धावसंख्या ही टी-10 लीगमधील सर्वात मोठी भागीदारी ठरलीये.
या धावांचा पाठलाग करताना दिल्ली बुल्स संघाला निर्धारित 10 षटकात 7 बाद 103 धावांपर्यंतच मजल मारता आली. चंद्रपॉल हेमराजने 20 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. डेक्कन ग्लेडिएटर्सकडून टाइमल मिल्स, वानिंदु हसारंगा आणि ओडियन स्मिथने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.