Ind vs Pak Asia Cup: आशिया कपच्या ठिकाणाबाबत मोठा निर्णय, सामने होणार पाकिस्तानात! वर्ल्ड कपसाठीही आले अपडेट

 asia cup 2023 sri lanka bangladesh support bcci for nutral vanue ind vs pak cricket news in marathi
asia cup 2023 sri lanka bangladesh support bcci for nutral vanue ind vs pak cricket news in marathi
Updated on

Ind vs Pak Asia Cup 2023 : एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणाऱ्या आशिया कप 2023 बाबत बराच काळ वाद सुरू आहे. खरे तर या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले होते आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल आणले होते.

त्यावरही बराच काळ वाद सुरू होता. पण आता ते संपुष्टात आले आहे. शनिवारी उशिरा पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानचे संकरित मॉडेल स्वीकारले आहे. त्यानुसार या स्पर्धेचे सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखालील आशियाई क्रिकेट परिषद आशिया चषक स्पर्धेसाठी पीसीबीच्या संकरित मॉडेलला मान्यता देण्याची शक्यता आहे. या स्थितीत पाकिस्तानसह इतर संघ पाकिस्तानमध्ये आपले सामने खेळतील. त्याचवेळी, भारतीय संघाचे सामने श्रीलंकेतील गाले आणि पल्लेकेले मैदानावर खेळवले जातील. यासह पीसीबीने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ पाठवण्यास सहमती दर्शवली आहे. म्हणजेच दीर्घकाळ चाललेल्या या वादानंतर आता चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

 asia cup 2023 sri lanka bangladesh support bcci for nutral vanue ind vs pak cricket news in marathi
Shubman Gill Catch Controversy: भारतावर अन्याय? वादग्रस्त झेलवर शुभमन गिलची प्रतिक्रिया, ICCचा नियम काय सांगतो

ACC मंगळवारी आशिया चषक आयोजित करण्याबाबत औपचारिक घोषणा करू शकते. हायब्रीड मॉडेलच्या अधिकृत स्वीकृतीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाला भारतात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्येही खेळण्यासाठी सज्ज आहे.

एसीसी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाशी संबंधित समस्या सोडविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या सदस्यांमध्ये ओमान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पंकज खिमजी यांचाही समावेश होता. बहुतेक देशांना हायब्रीड मॉडेल नको होते. मात्र, आतापर्यंत लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर चार सामने होणार असून, त्यात भारतीय संघ खेळणार नाही. हे सामने आहेत- पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध बांगलादेश.

 asia cup 2023 sri lanka bangladesh support bcci for nutral vanue ind vs pak cricket news in marathi
Ind vs Aus : चॅम्पियन होण्यासाठी टीम इंडियाला 540 चेंडूत 280 धावांची गरज! माजी कर्णधार अन् उप-कर्णधारवर भारताची मदार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीचे सीईओ ज्योफ अल्लार्डिस आणि चेअरमन ग्रेग बार्कले पीसीबी चेअरमन नजम सेठी यांची भेट घेण्यासाठी कराचीला गेले, भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानने कोणतीही अट ठेवणार नाही, असा निर्णय घेतला. आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जातो. कारण या स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार पीसीबीकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.