IND vs PAK : शेवटपर्यंत थरार; मोक्यावर चौका मारुन पाक विजयी

ind vs pak
ind vs pakTwitter
Updated on

दुबई : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने विजय नोंदवला. रवि कुमारच्या अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या संघाला 8 धावांची आवश्यकता होती. या षटकातील पहिल्या चेंडूवर रवि कुमारने जिशानला तंबूत धाडले. त्यानंतर अहमद खानने एकेरी-दुहेरी धावा करत संघाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरच्या चेंडूव दोन धावांची गरज असताना त्याने चौकार खेचून संघाला विजय मिळवून दिला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शंभरीच्या आतच निम्मा संघ तंबूत परतला होता. हरनूर सिंग 46 (59), अराध्या यादव 50(83), कौशल तांबे 32(38), राजवर्धन 30 (20) यांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 49 षटकांत सर्वबाद 237 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवातही खराब झाली.दुसऱ्याच चेंडूवर हंगरगेकर याने पाकला पहिला धक्का दिला. मोहम्मद शहजादने 105 चेंडूत 81 धावा करुन संघाचा डाव सावरला. अखेरच्या टप्प्यात भारतीय संघाने पाकिस्तानची अवस्था 8 बाद 230 धावा अशी केली होती. 6 चेंडूत 8 धावांची गरज असताना पाकिस्तान संघाने या धावा करत विजय पक्का केला.

युएईमध्ये १९ वर्षाखालील आशिया कपला (Under 19 Youth Asia Cup) २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दुबईत भिडत आहेत.पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाने टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करत इतिहास रचला होता. आता या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी १९ वर्षाखालील भारतीय संघाकडे आहे.

२३ डिसेंबरपासून सुरु झालेल्या आशिया कपच्या पहिल्याच दिवशी तीन सामने खेळवले गेले. स्पर्धेची सुरुवात भारत आणि युएई यांच्या सामन्याने सुरुवात झाली. आज हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामना होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ अ गटात आहेत. या गटात भारत, युएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या ब गटात श्रीलंका, कुवेत, बांगलादेश आणि नेपाळ या संघाचा समावेश आहे. आशिया कप २०२१ ची ३१ डिसेंबरला दुबईत रंगणार आहे.

159 धावांत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत

पाकिस्तानच्या २४ षटकात ३ बाद ८५ धावा

राज बवाने पाकिस्तानला दिला तिसरा धक्का, हासीबुल्ला ३ धावांची भर घालून परतला.

राज बवाने जोडी फोडली, पाकिस्तानला ६४ धावांवर चौथा धक्का

माझ सदाकद आणि मोहम्मद शेहजाद यांचा भागीदारी करण्याचा प्रयत्न

पाकिस्तानलाही पहिल्याच षटकात धक्का, अब्दुल वाहीद हंगरगेकरच्या दुसऱ्याच चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी

राजवर्धन हंगरगेकरची पुन्हा आक्रमक खेळी, २० चेंडूत ठोकल्या ३३ धावा; भारताचे पाकिस्तानसमोर २३८ धावांचे आव्हान

अराध्य यादव आणि कौशल तांबे यांची अर्धशतकी भागीदारी

अराध्या यादवच्या खेळीमुळे भारता 150 धावा

हरनूरचे अर्धशतक हुकले, भारताचा ९६ धावांवर निम्मा संघ माघारी

हरनूर सिंगची एकाकी झुंज

ओवैस अलीने दिला भारताला चौथा धक्का, निशांत सिंधू ८ धावा करुन माघारी. आठव्या षटकात भारताची अवस्था ४ बाद ४१ धावा.

झीशान झमीरचे भारताला पाठोपाठ दोन धक्के, शैक राशीद आणि कर्णधार यश धूल पाठोपाठच्या चेंडूवर बाद

पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का, अंगक्रिश रघुवंशी भोपळाही न फोडता माघारी

पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय (ACC Under 19 Youth Asia Cup)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.