Khel Ratna : 'खेलरत्न'साठी अचंता शरथ कमलची शिफारस; 'अर्जुन' पुरस्कारासाठी एकाही क्रिकेटपटूचे नाही नाव

Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal
Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal esakal
Updated on

Major Dhyan Chand Khel Ratna : भारताचा स्टार टेबलटेनिसपू अचंता शरथ कमलची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याचबरोबर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि कुस्तीपटू अंशू मलिकची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 40 वर्षाच्या शरथ कमलने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याने तीन सुवर्ण पदके आणि एक रौप्य पदक जिंकले होते.

Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal
ENG vs SL T20WC22 : इंग्लंडचा शेवटच्या षटकात विजय; लंकेने इंग्रजांना चांगलेच झुंजवले

यंदा खेलरत्नसाठी फक्त शकथ कमल या एकट्याच खेळाडूची शिफारस करण्यात आली आहे. शरथ कमलने आशियाई गेम्समध्ये देखील दोनवेळा पदक जिंकून दिले आहे. मनिका बात्रानंतर खेल रत्न पुरस्कार मिळवणारा शरथ हा दुसरा टेबल टेनिस खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, यंदा एकूण 25 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यात युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, बॉक्सर निखत झरीन आणि बुद्धीबळपट्टू प्रज्ञानंदा, कुस्तीपटू अंशू मलिक यांची देखील समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा अर्जुन पुरस्कारासाठी एकाही क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस करण्यात आलेली नाही.

Major Dhyan Chand Khel Ratna Achanta Sharath Kamal
T20 WC : भारताचा शेवटचा सामना पावसामुळे झाला नाही तर..., पाकिस्तान सेमी फायनल गाठणार?

लक्ष्य सेनने पुरूष बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. याचबरोबर तो ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेता ठरला होता. तो थॉमस कपमधील सुवर्ण पदक विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघातही होता. याचबरोबर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरूष एकेरीत सुवर्ण तर मिश्र दुहेरीत रौप्य पदक जिंकले आहे.

बॉक्सर निखत झरीनने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देखील सुवर्ण कमाई केली होती.

अर्जुन पुरस्कार शिफारसी :

सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निखत जरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानंधा (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), शुशीला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बोल्स), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), इलावेनिल वालारीवन (नेमबाजी), ओम प्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू मलिक (कुस्ती), सरिता मोर (कुस्ती), परवीन (वुशू), मनशी जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण धिल्लॉन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील पाटील (पॅरा स्विमिंग), जर्लिन अनिका जे (बधिर बॅडमिंटन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.