Paris Olympics 2024 achinta sheuli caught entering women hostel : पतियाळा येथील महिला खेळाडूंच्या हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी प्रवेश करत असल्याचे दिसून आला, त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर अंचिता सेऊली याची पॅरिस ऑलिंपिक तयारीसाठी सुरू असलेल्या कॅम्पमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली.
महिला हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाने अंचिका सेऊलीचा या हॉस्टेलमध्ये प्रवेश करत असताना व्हिडीओ काढला आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिस्तपालन समिती तेथे दाखल झाली. अशा प्रकारची शिस्तभंगता आम्ही कदापि सहन करणार नाही.
त्यामुळे आम्ही त्याला कॅम्पमधून तत्काळ बाहेर जाण्यास सांगितले आहे, असे भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
पतियाळा येथील एनआयएस आणि क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक विनीत कुमार यांना तत्काळ परिस्थितीची माहिती देण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ असल्याचे त्यांना सांगण्यात आले; परंतु सध्या तरी क्रीडा प्राधिकरणाने चौकशी समिती स्थापन केलेली नाही.
२०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सेऊलीने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. वेटलिफ्टिंग संघटनेकडून आदेश आल्यानंतर त्याने तत्काळ कॅममधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
पतियाळा येथे पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी वेगवेगळी हॉस्टेल आहेत. सध्या येथे बॉक्सर, अॅथलीट आणि कुस्तीपटू सराव करत आहेत. वेटलिफ्टर खेळाडूवर अशाप्रकारे शिस्तभंगाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रकुल आणि युवा ऑलिंपिक विजेता जेरमी लालरिनुंगा याच्यावरही अशाच प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.
तयारीसाठी सुरू असलेल्या कॅम्पमधूनच हकालपट्टी करण्यात आल्यामुळे सेऊली पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रतेतूनच बाहेर गेला आहे. परिणामी, तो या महिन्यात थायलंड येथे होत असलेल्या विश्वकरंडक वेटलिफ्टिंग स्पर्धेत जाऊ शकणार नाही.
ही स्पर्धा ऑलिंपिकच्या पात्रतेसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे सेऊलीचे ऑलिंपिक खेळण्याचे स्वप्न भंगणार हे निश्चित आहे. तो ऑलिंपिक पात्रता रँकिंगमध्ये २७व्या स्थानावर होता. ऑलिंपिकच्या कटऑफ कोटामुळे त्याला पात्रता मिळवण्याची अधिक संधी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.