हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचा ( Ad Hoc Committee) महाराष्ट्रातील मल्लांना इशारा दिला आहे. हिंदकेसरी खेळणाऱ्या पैलवान यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात समितीने जाहीर पत्रदेखील जाहीर केलं आहे. (Action will be taken against the wrestlers of Maharashtra who played in the Hind kesari wrestling tournament)
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी पत्र जाहिर केलं आहे.
काय म्हटलं आहे पत्रात?
भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये जर महाराष्ट्रातले पैलवान खेळले किंवा पंच तसेच पदाधिकारी तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अस्थाई समिती कारवाई करणार असे पत्रात नमूद केले आहे.
भारतीय शैली कुस्ती महासंघ व भारतीय कुस्ती संघ, हे दोन वेगवेगळे देशस्तरीय कुस्ती संघ आहेत. हिंदकेसरी हे टायटल वापरण्याचा अधिकार भारतीय शैली कुस्ती महासंघाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.