Adam Zampa : झॅम्पा वन-डेमध्ये सर्वात महागडा

दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ४१६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला २५२ धावांत गुंडाळून १६४ धावांचा विजय मिळवला.
adam zampa
adam zampa sakal
Updated on

सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी झालेला एकदिवसीय सामना विक्रमाच्या यादीत नोंद घेणारा ठरला. एक तर दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिच क्लासेनने तुफानी टोलेबाजी करत ८३ चेंडूंत १७४ धावा फटकावल्या. यात त्याने १३ चौकार आणि १३ षटकार मारले.

दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ४१६ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला २५२ धावांत गुंडाळून १६४ धावांचा विजय मिळवला.

येत्या काही दिवसांत भारतात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत झॅम्पा हा ऑस्ट्रेलियासाठी प्रमुख फिरकी गोलंदाज असू शकेल, पण त्या अगोदरच त्याच्या नावावर नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली. या सामन्यात त्याने १० षटकांत ११३ धावा दिल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देण्याच्या आपल्याच देशाच्या गोलंदाजाने अगोदर केलेल्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली.

adam zampa
Baramati Sports :बारामतीच्या टीसी कॉलेजचा प्रणव पोमणे जागतिक कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात समाविष्ट...

वन-डेत सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

०/११३ (१०) : मिक लुईस (ऑस्ट्रेलिया) वि. दक्षिण आफ्रिका

(जोहान्सबर्ग २००६)

०/११३ (१०) : अॅडम झॅम्पा (ऑस्ट्रेलिया) वि. दक्षिण आफ्रिका

(सेंच्युरियन २०२३)

adam zampa
India Vs Pakistan Cricket Match: क्रिकेट सामन्यासाठी भारताच्या दोन टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर? जाणून घ्या तारखा

०/११० (१०) वाहेब रियाझ (पाक) वि. इंग्लंड (नॉटिंगहॅम २०१६)

०/११० (९) राशीद खान (अफगाणिस्तान) वि. इंग्लंड (मँचेस्टर २०१९)

०/१०८ (१०) फिलिप बॉईलवेन (नेदरलँडस) वि. इंग्लंड (अॅमस्टेलवीन २०२२)

हेन्रिक क्लासेनचा तडाखा

३२ व्या षटकापर्यंत २५ चेंडूत २५ धावा

५० व्या षटकापर्यंत ८३ चेंडूत १७५ धावा

क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांची ९४ चेंडूंत २२ धावांची भागीदारी

adam zampa
Transgender cricketer : पुरूष झाली स्त्री! पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू 'या' संघाकडून खेळणार आंतरराष्ट्रीय सामना

क्लासेन `क्लासिक`

पहिल्या ५० धावा ः ३८ चेंडूत

५० ते १०० ः १९ चेंडूत

१०० ते १५० ः २० चेंडूत

१५० ते १७४ (२४ धावा) ः ६ चेंडूत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.