म्हसवड (सातारा) : ॲथलॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या (athletic federation of india) वतीने पंजाबमधील संगरुर येथे ‘वार हिरो’ या मैदानावर (War Hero Stadium) झालेल्या १९ व्या नॅशनल फेडरेशन चॅम्पियनशिपमध्ये (National Federation Championship) येथील माणदेशी चॅम्पियन्सची खेळाडू आदिती बुगड (Mandeshi Champion player Aditi Bugad) हिने डिस्कस थ्रो थाळीफेक (Throw Plate Game) खेळात सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. बुगड हिने ४७.९८ मीटर लांब अंतरावर थाळीफेक करून या खेळात नवीन उंच्चाक आपल्या नावे नोंदविला आहे.
आदिती मूळची इचलकरंजीतील रहिवाशी असून, तिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती.
आदिती मूळची इचलकरंजी येथील रहिवाशी असून, तिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. पण, तिला क्रीडाविषयी योग्य असे मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे तिला खूप अडचणीला सामोरे जावे लागले. अखेर तिने येथील माणदेशी चॅम्पियन्समध्ये प्रवेश घेऊन व क्रीडा सरावालाही सुरुवात केली. यशामागे आपले वडील अमित बुगड आणि माणदेशी क्रीडा प्रशिक्षकांचाही मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. बुगड हिचे ‘माणदेशी’च्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा, चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी अभिनंदन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.