Arjuna Award : साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! आदिती स्वामी, ओजस देवतळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या नावांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. | Dignity in the spirit of Satara! Arjuna Award announced to Aditi Swamy, Ojas Devtale...
Arjuna Award Aditi Swami Ojas Devtale
Arjuna Award Aditi Swami Ojas Devtaleesakal
Updated on
Summary

रेवाडीसारख्या छोट्याशा खेड्यातून पुढे आलेल्या अन् सध्याच्या काळात देशातील स्टार खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदितीच्या तिरंदाजीतील कर्तृत्वावर अर्जुन पुरस्काराची मोहोर उमटली.

मुंबई / नागठाणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी करीत भारताचा झेंडा दिमाखात फडकाविणाऱ्या शेरेवाडी (ता. सातारा) येथील आदिती गोपीचंद स्वामी व साताऱ्यातील शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी ओजस देवतळे या तिरंदाजांची ‘अर्जुन’ या भारतातील प्रतिष्ठेच्या क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या नावांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुढील वर्षी (२०२४) नऊ जानेवारीला विजेत्यांना क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातील.

Arjuna Award Aditi Swami Ojas Devtale
ICC ODI Ranking : प्रिन्स गिलला धक्का, पाकिस्तानच्या माजी कर्णधार रँकिंगमध्ये अव्वल स्थानी

रेवाडीसारख्या छोट्याशा खेड्यातून पुढे आलेल्या अन् सध्याच्या काळात देशातील स्टार खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदितीच्या तिरंदाजीतील कर्तृत्वावर अर्जुन पुरस्काराची मोहोर उमटली. स्वामी कुटुंबीय कौतुकाच्या वर्षावात चिंब झाले.

ओजस देवतळे यास अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले, ‘‘आम्हा सर्वांना अत्यानंद झाला. रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा हा पहिला विद्यार्थी असेल त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

प्रचंड मेहनत, फक्त सरावावर- खेळावर लक्ष केंद्रित करणारा अत्यंत नम्र गुणाचा हा विद्यार्थी निश्चित यशस्वी होईल, याची आम्हाला खात्री होती. त्याने ते सिद्ध करून दाखवले. त्याच्या या यशामुळे रयत शिक्षण संस्थेच्या आणि साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ओजस व त्याचे प्रशिक्षक, आई-वडील या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.’’

Arjuna Award Aditi Swami Ojas Devtale
Mohammed Shami : चिराग - सात्विकचा खेल रत्नने सन्मान; वर्ल्डकप गाजवणाऱ्या शमीला अर्जुन पुरस्कार

आदितीला मिळालेला अर्जुन पुरस्कार हा तिच्या आजवरच्या कष्टाची व तिने केलेल्या कामगिरीची पोचपावतीच आहे. खेळाडू म्हणून तिने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. तिच्या यशातून अनेक उदयोन्मुख खेळाडू प्रेरणा घेतील, जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील, यात शंका नाही.

-शैला अन् गोपीचंद स्वामी,आदितीचे आई-वडील

हा सन्मान इतक्या लवकर, इतक्या कमी काळात मिळेल, याची अपेक्षा नव्हती. प्रशिक्षक प्रवीण सावंत, माझे आई-वडील आणि मला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा या यशात वाटा आहे. दै. ‘सकाळ’ने तर अगदी पहिल्या स्पर्धेपासून मला प्रसिद्धी देऊन प्रोत्साहित केले. या साऱ्यांचीच मी ऋणी आहे.

-आदिती गोपीचंद स्वामी

Arjuna Award Aditi Swami Ojas Devtale
अभिमानास्पद! कोल्हापुरातील प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण'ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

‘दृष्टी’चा प्रशिक्षणार्थी

२१ वर्षीय ओजस हा मूळचा नागपूरकर आहे. अर्थात तिरंदाजीच्या प्रशिक्षणासाठी तो साताऱ्यात वास्तव्यास असतो. सध्या तो छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकतो. महामार्गानजीक वाढे फाटा येथील सुजित शेडगे, सायली सावंत यांच्या दृष्टी ॲकॅडमीमध्ये तो प्रशिक्षण घेतो. प्रशिक्षक प्रवीण सावंत, सहायक प्रशिक्षक शिरीष ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.