AFG vs PAK 1st T20 : बदला! अफगाणिस्तानने रचला इतिहास; बाबर-रिजवान शिवाय पाकिस्तानचे हाल

आशिया कप पराभवाचा घेतला बदला! T20 मध्ये पाकिस्तानचा पराभव
AFG vs PAK 1st T20
AFG vs PAK 1st T20
Updated on

AFG vs PAK 1st T20 : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाण संघाने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून मोठा अस्वस्थता निर्माण केला आहे.

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आहे. यासह यजमान अफगाणिस्तानने पाहुणा पाकिस्तानवर मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

AFG vs PAK 1st T20
Asia Cup 2023: पाकिस्तानकडे BCCIची पाठ! भारताचे सामने UAE, श्रीलंका किंवा इंग्लंडमध्ये

शादाब खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेसाठी बाबर आझम, मोहम्मद रिझवान, हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना विश्रांती देण्यात आली आहे.

पाकिस्तानचा निम्मा संघ 41च्या धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर पहिल्या फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फलंदाज हतबल दिसत होते. सैम अयुब (17), तय्यब ताहिर (16), इमाद वसीम (18) आणि शादाब खान (12) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाकिस्तानचा संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 92 धावाच करू शकला. अफगाणिस्तानसाठी वेगवान गोलंदाज फझल्लाक फारुकी, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

AFG vs PAK 1st T20
Lionel Messi : लिओनेल मेस्सीचा ८०० वा गोल! पनामावर विश्वविजेत्या अर्जेंटिनाचा दमदार विजय

93 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाला 45 धावांच्या एकूण धावसंख्येवर 4 धक्के बसले. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज (16), इब्राहिम झद्रान (9), गुलबदिन नायब (शून्य) आणि करीम जनात यांनी 7 धावा केल्या. या सगळ्यात अनुभवी नबीने 38 चेंडूत नाबाद 38 धावा करत अफगाणिस्तानला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

अफगाणिस्तानने 17.5 षटकात 4 विकेट गमावत 98 धावा करत सामना जिंकला. नबीच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मालिकेतील दुसरा टी-20 सामना 26 मार्च रोजी होणार आहे.

AFG vs PAK 1st T20
Cricket News : २०२२ मधल्या १३ क्रिकेट सामन्यात मोठा भ्रष्टाचार? अहवालातून धक्कादायक माहिती समोर

या विजयासह अफगाणिस्तानने गतवर्षीच्या आशिया कपमधील पराभवाचा बदला घेतला आहे. शारजाहमध्येच झालेल्या त्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 6 विकेट गमावत 129 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने एकवेळ 118 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या, मात्र नसीम शाहने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारत सामना जिंकला. त्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. पाकिस्तानी खेळाडू आसिफ अलीने तर अफगाण गोलंदाजाला मारण्यासाठी बॅट उचलली. दोन्ही देशांच्या प्रेक्षकांमध्ये जोरदार भांडण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.