पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रयस्त ठिकाणी होणाऱ्या वनडे मालिकेसंदर्भता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तान संघाचे शिबिर शनिवारपासून सुर होणार होते. मात्र पाकिस्तानने शिबिर आणि संघ निवडीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान संघटनेची सत्ता आल्यानंतर अनेक घडामोडी घडत असताना अफगाणिस्तान बोर्डाने क्रिकेटमध्ये कोणताही खंड पडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 20 वर्ल्ड कपसह आगामी नियोजित क्रिकेट मालिका वेळापत्रकानुसार यशस्वीरित्या पार पडतील, असे अफगाणिस्तान बोर्डाने म्हटले होते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेत होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेगळाच पवित्रा घेतल्याचे दिसते.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका 3 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्यावतीने श्रीलंका बोर्ड या वनडे मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडून काबूलमधून कोलंबला कधी रवाना होणार याची पुष्टी दिलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत मालिकेसंदर्भातील प्रवासाचे वेळापत्रक निश्चित होत नाही तोपर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाचे सिलेक्शन आणि कॅम्पसंदर्भात आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तालिबान आणि काबुल विमानतळाच्या उड्डाणांचे नियंत्रण करणाऱ्या अमेरिकी लष्करासोबतही यासंदर्भात चर्चा करत आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानचा संघ कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, हसन अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना विश्रांती देणार असल्याचेही बोलले जात आहे. हे खेळाडू न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या विरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या स्पर्धेतून कमबॅक करतील. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.