भर मैदानात राशिदनं दाखवलं देश प्रेम; चाहत्यांनी दिला सेल्युट!

सध्याच्या घडीला राशिद खान इंग्लंडमधील 'द हंड्रेड' टूर्नामेंटमध्ये व्यस्त आहे.
Rashid Khan
Rashid Khan Twitter
Updated on

तालिबानच्या नापाक इराद्यानं अफगाणिस्तानमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालिबान संघटनेनं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर त्यांच्या दहशतीमुळे देशातील नागरिकांची धावफळ सुरु आहे. घरातील सामना सोडून लोक देश सोडून पळत आहेत. देशातील ह्रदयद्रावक परिस्थितीमुळे अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानही चिंतेत आहे. त्याला आपल्या कुटुंबियांसह देशातील नागरिकांची काळजी वाटत आहे. आमच्या देशाला एकटे टाकू नका, अशी याचनाही त्याने केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्याने केलेल्या कृत्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

सध्याच्या घडीला राशिद खान इंग्लंडमधील 'द हंड्रेड' टूर्नामेंटमध्ये व्यस्त आहे. तो दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यात व्यस्त असला तरी अफगाणिस्तानवरील घडामोंडीवर त्याचे बारिक लक्ष आहे. स्पर्धेसाठी मैदानात खेळत असताना त्याने अनोख्या प्रकारे देशाचे समर्थन केले आहे. साउदर्न ब्रेव्ह संघा विरुद्ध खेळताना राशिद खानने आपल्या चेहऱ्यावर अफगाणिस्तानच्या ध्वजाची रंगरंगोटी केल्याचे पाहायला मिळाले. त्याचे हे कृत्य देशभक्तीचे उदाहरण दाखवून देणारी असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Rashid Khan
"सचिन-लारा सन्मान करायचे तर सेहवाग नुसती धुलाई"

त्याच्या देशभक्तीला चाहते सेल्युट करत आहेत. राशिद खान प्रतिनिधीत्व करत असलेल्या टीमल या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह ट्रेंट रॉकेट्स संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र देशाचे समर्थन करताना राशिद खानने तालिबान संघटनेचा निषेध नोंदवल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. त्याच्या या भूमिकेला चाहते दाद देत आहेत.

Rashid Khan
बॅडमिंटन कोर्टची बाळासाहेब पाटीलांनी केली पहाणी; पाहा व्हिडिओ

या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ 96 धावा केल्या होत्या. संघातील स्टार फलंदाज डेविड मलान, एलेक्स हेल्स आणि डार्सी शॉर्ट धावा करण्यात अपयशी ठरले. परिणामी निर्धारित 100 चेंडूत राशिदच्या संघाला 96 धावांपर्यंतच मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना साउदर्न ब्रेव्ह संघाने 68 चेंडूत लक्ष्य साध्य केले. त्यांनी 7 विकेट राखून सामना खिशात घातला. साउदर्नच्या संघाकडून पॉल स्टर्लिंगने 31 आणि जेम्स विन्सने नाबाद 45 धावांची खेळी केली. फायनलमध्ये आता ते मोइन अलीच्या नेतृत्वाखालील बर्मिंघम फिनिक्सविरुद्ध लढत देतील. रविवारी फायनल खेळवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.