AFG vs NED : अफगाणिस्तान सेमी फायनलच्या उंबरठ्यावर? पॉईंट टेबलमध्ये पाकिस्तानला खेचलं खाली

AFG vs NED
AFG vs NED esakal
Updated on

AFG vs NED World Cup 2023 Point Table : वर्ल्डकप 2023 मधील आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा 7 विकेट्सनी पराभव करत मोठा विजय मिळवला. अफगाणिस्तानने नेदरलँड्सचे 180 धावांचे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाबाद 56 धावांची खेळी केली.

या विजयाबरोबरच अफगाणिस्तानने वर्ल्डकपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी घेतली आहे. ते आता 7 सामन्यातील चार सामन्यात विजय मिळवत 8 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहचले आहेत. त्यांनी पाकिस्तानला सहाव्या स्थानावर खेचले. अफगाणिस्तान हे आता सेमी फायनलसाठीच्या पहिल्या चार संघात समावेश होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

AFG vs NED
AFG vs NED : अफगाणिस्तान सेमी फायनलच्या उंबरठ्यावर? पॉईंट टेबलमध्ये पाकिस्तानला खेचलं खाली

नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले होते. लखनौच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्तान हे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर उतरले. सलामीवीर रहमनुल्ला गुरबाज आणि इब्राहीम झादरान यांनी आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र वॅन बीकने गुरबाजला 10 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

मात्र यानंतर झादरान आणि रहमत शाह यांनी संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. सकारात्मक फलंदाजी करणाऱ्या रहमतची 20 धावा करून झादरानने साथ सोडली. अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर नेदरलँड सामन्यात जोरदार पुनरागमन करेल आशी आशा निर्माण झाली होती.

AFG vs NED
Mumbai Indians : रोहित शर्मानं केएल राहुलला दिला धक्का; मोठा मासा स्वस्तात लावला गळाला

मात्र रहमत शाहच्या जोडीला आलेल्या कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने दमदार भागीदारी रचली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 74 धावा जोडत संघाला 129 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान शाहने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र तो अर्धशतक करून बाद झाला. सेट झालेला शाह जरी बाद झाला असला तरी नेदरलँड्सच्या हातातून सामना निसटला होता.

कर्णधार शाहिदीने नाबाद 56 धावा करत अफगाणिस्तानचा विजय 31 व्या षटकातच निश्चित केला. शाहिदीला साथ देणाऱ्या अझमतुल्ला ओमरजाईने 28 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. नेदरलँड्सचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील सात सामन्यानंतरचा पाचवा पराभव आहे. त्यांचे वर्ल्डकपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.