सर्बियाचा स्टार टेनिसपटू आणि गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचे US Open स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. अमेरिकन खुल्या स्पर्धेत १६ वर्षांत प्रथमच जोकोव्हिच तिसऱ्या फेरीत पराभूत झाला आहे. १६ वर्षांत प्रथमच तो चौथ्या फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. २८व्या मानांकित ऑस्ट्रेलियन खेळाडू अलेक्सी पोपिरिनने हा धक्कादायक निकाल नोंदवला.
न्यूयॉर्कमध्ये चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या ३७ वर्षीय जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून ६-४, ६-४, २-६, ६-४ असा पराभव पत्करावा लागला. त्याच्या २५ ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या स्वप्नांना तुर्तास ब्रेक लागला आहे. आजच्या सामन्यात त्याने १४ डबल फॉल्ट केले आणि ४९ अनफोर्स एरर केले. २०१७ नंतर प्रथमच तो ग्रँड स्लॅम विजेतेपदाशिवाय सीझनचा शेवट करेल.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जॅनिक सिन्नरने त्याला पराभूत केले होते, त्यानंतर कार्लोस अल्काराजने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावताना जोकोव्हिचला हार मानण्यास भाग पाडले होते. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत त्याचा पराभव करून, सिन्रने त्याचे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान हिसकावले होते. जोकोव्हिचने हे स्थान ४२८ आठवडे स्वतःकडे राखले होते.