IND vs SL : टीम इंडियाला आणखी एक धक्का, सुर्यकुमार यादवही मालिकेला मुकणार

Suryakumar Yadav
Suryakumar YadavSakal
Updated on

Suryakumar Yadav Injury News : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुसरा झटका बसला आहे. लौकिकाला साजेसा खेळ करुन आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून देणारा सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा दुखापतग्रस्त आहे. दुखापतीमुळे दीपक चहर पाठोपाठ आता तोही टी-20 मालिकेला मुकणार आहे. 31 वर्षीय फलंदाजाच्या हाताला फॅक्चर झाल्याचे समजते. (Suryakumar Yadav Also Ruled Out Of T20I Series Against Sri Lanka Due To Injury)

लखनऊमधील टीम इंडियाच्या (Team India) सराव सत्रावेळी सुर्यकुमार यादव दिसला. पण तो सरावासाठी मैदानात उतरला नाही. त्यामुळे तोही स्पर्धेला मुकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याआधी दीपक चाहरने स्नायू दुखापतीमुळे संपूर्ण टी-20 स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Suryakumar Yadav
ती गोष्ट कायम सलत राहील; वर्ल्ड कप आधी मितालीचं मोठ वक्तव्य

सुर्यकुमारच्या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत सुर्यकुमार यादवने लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता. पण आता तो श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला मुकणार असल्याचे दिसते.

Suryakumar Yadav
आरे कॉल बॅक करशील का? रितिकानं घेतली रोहितची फिरकी

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी दीपक चहरने टी-20 मालिकेतून माघार घेतली होती. त्याच्या बदल्यात कोणत्याही खेळाडूचा संघात स्थान देण्यात आलेले नाही, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. बायो-बबल प्रोटोकॉलमुळे कमी वेळात नवी रिप्लेसमेंटही शक्य नाही. सध्याच्या घडीला टीम इंडियाच्या ताफ्यात 16 सदस्य उरले आहेत. 24 फेब्रुवारीपासून लखनऊच्या मैदानात या मालिकेला सुरुवात होणार आहे. 26 आणि 27 फेब्रुवारीला धरमशाला येथे अखेरचे दोन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.