Diljit Dosanjh चं कॉन्सर्ट अन् खेळाडूंच्या भविष्याशी खेळ! उपकरणं तोडली, मैदानावर कचराच कचरा अन् दारूच्या बाटल्यांच्या काचा

Jawaharlal Nehru Stadium New Delhi नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांचा दुहेरी आकडा मिळवणाऱ्या निर्धाराने गेलेल्या भारतीय खेळाडूंना फक्त ६ पदकं घरी आणता आली.
Diljit Dosanjh
Diljit Dosanjhesakal
Updated on

Diljit Dosanjh’s Dil-luminati concert - नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जेव्हा भारतीय खेळाडू सरावासाठी आले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. ट्रॅकवर कचऱ्याचे साम्राज्य, तिहेरी उडी मारतात त्या वाळूत बिअर बॉटलच्या काचा, तुटलेली साहित्य... हे सर्व पाहून खरं तर खेळाडूंना चिडच आली असावी. पण, सांगणार तरी कोणाला अशी त्यांची अवस्था झाली असेल. प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ याचे Dil-Luminati कॉन्सर्ट दिल्लीच्या याच जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसांच्या कॉन्सर्टनंतर भारतातील सर्वोत्तम क्रीडा सुविधा असलेल्या स्टेडियमची झालेली अवस्था खेळाडूंना पाहवत नव्हती. आता यावरून आयोजकावर टीका सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.