आधी टीम इंडिया मग IPL; रोहितनं सांगितला 'मेगा प्लॅन'

Rohit Sharma
Rohit SharmaANI
Updated on

Rohit Sharma Press Conference T20I Series: वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने माजी कर्णधार आणि आपला सहकारी विराट कोहलीसाठी दमदार बॅटिंग केली. रोहितने मेगा ऑक्शनवरही प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाने पहिल्यांदा टीम इंडियाचा विचार करा; असा सल्ला खेळाडूंना दिल्याचेही त्याने सांगितले.

IPL पेक्षा वर्ल्ड कप महत्त्वाचा

रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, आयपीएलचा कोणताही विचार डोक्यात नाही. सर्व खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून वेगवेगळी भूमिका बजावतात. सध्याच्या घडीला आम्हाला फक्त भारतीय टीमचा (Team India) विचार करायचा आहे. वर्ल्ड कप तोंडावर आहे. आयपीएल फक्त दोन महिने खेळलं जाते. आम्ही 10 महिने टीम इंडियासाठी खेळतो. ही गोष्ट प्रत्येक खेळाडूला माहित आहे. त्यानुसारच ते सर्व टीम इंडियाकडून सर्वोत्तम खेळ करण्याच्या इराद्याने योग्य ती तयारी करतील, असे सांगत रोहितने आयपीएलपेक्षा आमच्यासाठी वर्ल्ड कप महत्त्वाचा आहे, असे म्हटले आहे.

Rohit Sharma
IPL 2022 : टेनिस क्रिकेटरसाठी कसा उघडला IPL चा दरवाजा?

टी-20 मध्ये ऑलराउंडरची भूमिका महत्त्वाची

जेव्हा तुम्ही क्रिकेटमधील शॉर्ट फॉर्मेटमध्ये खेळता त्यावेळी बॅटिंग आणि बॉलिंग करु शकणाऱ्या खेळाडूची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. अष्टपैलू खेळाचे पारडे इकडून तिकडे पलटू शकतात, असे रोहितनं म्हटलं आहे. यावेळी त्याने हार्दिक पांड्यासंदर्भातही भाष्य केले. हार्दिक पांड्या एक महत्वपूर्ण क्रिकेटर आहे, परंतु त्याच्याकडे आम्ही फलंदाज म्हणून पाहायचे की अष्टपैलू याबाबत सध्याच्या घडीला आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही.

Rohit Sharma
'फॉर्मची चिंता...' कर्णधार रोहितने विराटची केली पाठराखण

टी-20 वर्ल्ड कप तयारीसंदर्भात काय म्हणाला रोहित?

टी-20 वर्ल्ड कपसाठी सध्याच्या घडीला सर्वांसाठी दरवाजे खुळे आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम सिलेक्शनची कोणतीही घाई करणार नाही. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. याठिकाणी तुमच्याकडे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी रणनिती आखावी लागेल. तशी तयारी आपल्याला करायची आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.