जिमीनं ब्रॉडला म्हटलं होतं लेस्बियन! ट्विट व्हायरल

किशोर वयात वाचाळ बडबड करणाऱ्या रॉबिन्सननंतर आता आणखी एका दिग्गज इंग्लिश क्रिकेटरच नाव याप्रकरणात समोर आले आहे.
James Anderson Stuart Broad
James Anderson Stuart Broad File Photo
Updated on

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून ओली रॉबिन्सनने कसोटी पदार्पण केल्यानंतर वर्णभेद आणि लिंगभेदाच्या वादाला तोंड फुटले. त्याने किशोर वयात केलेली आक्षेपार्ह ट्विट नेटकऱ्यांनी व्हायरल केली आणि रॉबिन्सनच्या कसोटी कारकिर्दीला पदार्पणाच्या सामन्यानंतर ब्रेक लागला. ज्या सामन्यात खेळला त्याच सामन्यानंतर निलंबनाची कारवाई होणारा नकोसा विक्रम रॉबिन्सनच्या नावे जमा झालाय. हे प्रकरण दिवसागणिक वेगळे वळण घेत असून यात आता आणखी काही इंग्लिश क्रिकेटर वादात अडकण्याची शक्यता निर्माण झालीये.

किशोर वयात वाचाळ बडबड करणाऱ्या रॉबिन्सननंतर आता आणखी एका दिग्गज इंग्लिश क्रिकेटरच नाव याप्रकरणात समोर आले आहे. जेम्स अँडरसन यानेही ब्रॉडला उद्देशून लिंगभेदी टिप्पणी केली होती. यासंदर्भातील एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 11 वर्षांपूर्वी जेम्स अँडरसनने त्याचा सध्याचा सहकारी आणि इंग्लंडच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडचा 'लेस्बियन' असे संबोधले होते.

रॉबिन्सन प्रमाणे भूतकाळात ज्या क्रिकेटर्संनी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह ट्विट केलेल्या खेळाडूंची नावे समोर येत असताना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने अशा सर्व खेळाडूंची चौकशी करण्याचा पवित्रा घेतलाय. ज्या रॉबिन्सनवर पहिल्याच सामन्यात कठोर कारवाई केली त्याप्रमाणे प्रमुख गोलंदाजाला धडा शिकवण्याचे धाडस इंग्लंड बोर्ड करणार का? असा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतोय.

James Anderson Stuart Broad
वर्णभेदाच्या प्रकरणात आणखी एक इंग्लिश प्लेयर अडचणीत

38 वर्षीय अँडरसनचे जे ट्विट व्हायरल होत आहे ते त्याने 2010 मध्ये केल्याची चर्चा आहे. त्यावेळी त्याने ट्विटमध्ये लिहिले होते की, पहिल्यांदाच ब्रॉडीची नवीन हेयर स्टाईल पाहायला मिळाली. त्याला पाहिल्यानंतर तो 15 वर्षांचा लेस्बियन असल्यासारखे वाटले, असे जिमीने म्हटले होते. या ट्विटवर अँडरसनने प्रतिक्रियाही दिलीये. ही 10-11 वर्षांपूर्वीची घटना आहे. एक व्यक्ती म्हणून माझ्यात खूप बदल झालाय. आयुष्यात गोष्टी बदलत असतात. चुकातून आपण शिकत असतो, अशा आशयाची सारवासरव अँडरसनने व्हायरल ट्विटवर केलीये.

James Anderson Stuart Broad
निलंबित इंग्लिश क्रिकेटरसाठी पंतप्रधानांचा '​स्ट्रेट ड्राइव्ह'

इंग्लंडच्या अनेक क्रिकेटर्संनी केली आहेत वादग्रस्त ट्विट

अँडरसनशिवाय इयॉन मॉर्गन, जोस बटलर, जो रूट आणि डॉम बेस सह इंग्लंडच्या अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपत्तिजनक ट्विट केल्याचे पाहायला मिळाले आहे. रॉबिन्सनच्या वादग्रस्त प्रकरणानंतर 10 वर्षांपूर्वी अनेक क्रिकेटर्संटर्सची कथित वादग्रस्त ट्विटमुळे अनेकजण अडचणीत येऊ शकतात. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने याप्रकरणातील चौकशीची व्याप्ती वाढवली असून दिग्गज क्रिकेटरचे काय होणार? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()