Team India South Africa Tour Captaincy : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ (Team India) कसोटी मालिकेसह वनडे (ODI) सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाच्या नेतृत्वात (Team India Captaincy) आणखी एक मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळण्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्याचा विचार बीसीसीआयने (BCCI) केला असल्याचे बोलले जात आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. जर हे वृत्त खरे निघाले तर यापूढे विराट कोहली केवळ कसोटीतच नेतृत्व करताना दिसेल.
गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट जगतात इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारख्या संघांनी मर्यादीत षटकांसाठी आणि कसोटी संघासाठी विभागून नेतृत्व निवडीला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात या स्प्लिट कॅप्टन्सीला भारतात विरोध झाला. पण टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघही या मार्गावर जाण्यास तयार झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता वनडेत रोहित राज्य आल्याचे पाहायला मिळेल. बीसीसीआयकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून रोहितनं सुरु केली कॅप्टन्सीची नवी इनिंग
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे टी-20 संघाचे नेतृत्व देण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर रंगलेली तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली होती.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
26 डिसेंबर 2021 पासून भारतीय संघ कसोटी सामन्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात करेल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर 19 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका नियोजित आहे. यावेळी कोहली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.