India Vs Pakistan : सलमानचा डोळा थोडक्यात वाचला! जडेजाच्या गोलंदाजीवर केलेलं 'ते' धाडस आलं असतं अंगलट

India Vs Pakistan Agha Salman Eye Injured
India Vs Pakistan Agha Salman Eye Injured esakal
Updated on

India Vs Pakistan Agha Salman Eye Injured : आशिया कपमधील भारत - पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या संघाला दुखापतींचे ग्रहण लागले. आधी हारिस रौऊफ त्यानंतर नसीम शाह आणि आता आगा सलमान या खेळाडूंना दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना आगा सलमानचा डोळा तर थोडक्यात वाचला.

भारताने पाकिस्तान समोर विजयासाठी 357 धावांचे आव्हान ठेवले असताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. त्यांची अवस्था 3 बाद 47 धावा झाली असताना फकर जमान आणि आगा सलमान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलदीपने जमानची शिकार करत ही जोडी फोडली.

India Vs Pakistan Agha Salman Eye Injured
Shreyas Iyer Fitness : केएलनं शतक ठोकलं... फिटनेस दाखवून दिला तरी NCA वर लोकं का जाळ काढत आहेत?

यानंतर आगा सलमानने पाकिस्तानची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात 21 व्या षटकात त्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. रविंद्र जडेजा टाकत असलेल्या 21 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आगा सलामानने पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटला लागून थेट त्याच्या डोळ्याखाली लागला. सलामानने हेलमेट घातले नसल्याने त्याला चांगलीच दुखापत झाली. त्याच्या डोळ्याखालून रक्त येऊ लागले होते.

India Vs Pakistan Agha Salman Eye Injured
क्रिकेटची मान झुकली! पाकिस्तानी खेळाडूला १२ वर्षांची शिक्षा.. खासदाराच्या हत्येला प्रोत्साहन देण्याचा आरोप

त्याला दुखापत झाल्या झाल्या राहुलने त्याची विचारपूस करत खिलाडू वृत्ती दाखवली. सलमानवर उपचार करण्यासाठी फिजिओ मैदानात आल्याने काही काळ सामना थांबला होता. त्याच्या दुखापतीवर मलपट्टी केल्यानंतर तो पुन्हा खेळू लागला. मात्र कुलदीप यादवने त्याला फार काळ खेळपट्टीवर ठेवले नाही. 24 व्या षटकात सलमानची 23 धावांची छोटेखानी खेळी संपली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.