Ahmedabad Stadium : नरेंद्र मोदी स्टेडियमचा विक्रम; एकदिवसीय विश्‍वकरंडकातील अंतिम सामन्यात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकातील अंतिम सामना खेळवण्यात आला.
Narendra Modi Stadium Crowd
Narendra Modi Stadium Crowdsakal
Updated on

अहमदाबाद - अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विक्रम नोंदवला गेला. भारतासह जगभरातून तब्बल एक लाख ३० हजार क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये बसून लढतीचा आनंद घेतला. एकदिवसीय विश्‍वकरंडकातील अंतिम सामन्यासाठी उपस्थित असलेली ही सर्वाधिक प्रेक्षकसंख्या ठरली, हे विशेष.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे नव्याने तयार करण्यात आले आहे. या स्टेडियमची प्रेक्षक मर्यादाही वाढवण्यात आली आहे. तसेच इतर सोयीसुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक क्रिकेटप्रेमी बसू शकतील, असे हे स्टेडियम बनले आहे. त्यामुळे भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामधील अंतिम लढतीदरम्यान नवा विक्रम प्रस्थापित झाला.

मेलबर्नचा विक्रम मोडीत

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमच्या नावावर सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा विक्रम होता. २०१५मधील विश्‍वकरंडक ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड या देशांमध्ये अंतिम फेरीची लढतही याच दोन देशांमध्ये पार पडली. या लढतीसाठी ९३,०१३ क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती.

वानखेडेमध्ये ४२ हजार क्रिकेटप्रेमींची उपस्थिती

२०११मधील विश्‍वकरंडकाचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगला. भारत - श्रीलंका यांच्यामध्ये ही लढत पार पडली. या लढतीसाठी तब्बल ४२ हजार क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शवली होती. या लढतीत भारताने श्रीलंकेला पराभूत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com